एक्स्प्लोर

'तो' देशाशी गद्दारी करणार नाही; हेरगिरीच्या आरोपात जेलमध्ये जाताच गौरव पाटीलच्या आईची प्रतिक्रिया

प्रमुख संशयीत आरोपी गौरव अर्जुन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती काल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

जळगाव:  माझा मुलगा हा निर्दोष आहे. तो देशाशी कधीही गद्दारी करणार नाही,त्याला फसविण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानसाठी  गोपनीय माहिती पुरवल्याच्या संशयावरून एटीएसने अटक करण्यात आलेल्या गौरव पाटीलच्या (Gaurav Patil)  आई- वडिलांनी  एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. ठाण्यातून (Thane)  गौरव पाटील या तरूणाला महाराष्ट्र एटीएसकडून (Maharashtra ATS)  अटक केली असून मुंबई नौदल तळाची माहिती पाकला पुरवल्याचा आरोप गौरववर  करण्यात आला आहे.

भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील हस्तकाला देणार्‍या तरुणाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यातील प्रमुख संशयीत आरोपी गौरव अर्जुन पाटील हा जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती काल उघड झाल्याने एकच खळबळ उडाली होती.

पालकांना मोठा धक्का

दरम्यान, सध्या ठाण्यात वास्तव्यास असणार्‍या तरुण राज्य दहशतवाद विरोधी पथकाने एक संशयित पाकिस्तानातील गुप्तचर विभागातील हस्तकाला भारतातील प्रतिबंधित क्षेत्रातील गोपनीय व संवेदनशील माहिती देत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाली होती.  जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील रहिवाशी गौरव पाटील याला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे.  त्याचे आयटीचे शिक्षण झाले असून मुंबईच्या नेव्हल डॉक यार्डमध्ये सहा महिन्यांचे शिकाऊ शिक्षण घेतले होते. काल अचानक त्याला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून याचा त्याच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.

या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी गौरव अर्जुन पाटील यांचे वडील म्हणाले की, माझा मुलगा हा निर्दोष आहे. तो अभ्यासात हुशार असून तो सैन्य भरती पोलीस भरतीची तयारी करत होता. त्याला देशाची सेवा करायची असून तो देशाशी गद्दारी कधीच करणार नाही. त्याला या प्रकरणात फसविण्यता आले आहे.  एक दिवस फोन करून त्याला मुंबईला बोलावले आणि अटक केली त्यावेळी मला खूप धक्का बसला अशी माहिती गौरवच्या वडिलांनी दिली आहे. माझा मुलगा निर्दोष असून सरकारने त्याला निर्दोष सोडावे अशी मागणी गौरवच्या वडिलांनी केली आहे. तर, गौरव अर्जुन पाटील याच्या अटकेची माहिती आज मिळताच परिसरात एकच चर्चेला उधाण आल्याचे दिसून येत आहे. 

हे ही वाचा :

PCMC ATS : बोटांचे ठसे अन् डोळ्यांच्या फोटोंच्या साहय्याने बनावट आधारकार्ड केंद्र चालवणाऱ्यांचा पर्दाफाश; पिंपरी चिंचवड एटीएसची कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget