वाढदिवस ठरला अखेरचा दिवस! घरात वाढदिवसाची लगबग, जळगावात चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू
Maharashtra: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशी कुलरचा शॉक बसल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Jalgaon Latest Marathi News : जळगावमध्ये मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. वाढदिवसाच्या दिवशी नऊ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झालाय. कुटुंबीय वाढदिवसाची तयार करत होते, त्यावेळी कुलरचा शॉक लागून मुलीचा दुर्देवी मृत्यू झालाय. मुक्ताईनगरमधील सनान्से कुटुंबात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेनंतर मुक्ताईनगरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सनान्से कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये आज ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील जिजाईनगर भागातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये राहत असणाऱ्या मुलीला कुलरचा शॉक बसल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीचा नववा वाढदिवस असल्याने सनान्से कुटुंबीय वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन करत होते. याच सुमारास कुलरचा जबरदस्त शॉक लागल्याने चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. वैष्णवी चेतन सनान्से असे या चिमुरडीचे नाव आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ऐन वाढदिवसाच्या दिवशी अशी घटना घडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुक्ताईनगर शहरातील जिजाईनगर भागातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये सनान्से कुटुंबीय वास्तव्यास आहे. मुलीचा नववा वाढदिवस असल्याने आठ दिवसांपासून घरात वाढदिवसाचे नियोजन सुरू होते. अनेक जवळच्या नातेवाईकांना सनान्से कुटुंबीयांनी कळवले होते, त्यामुळे मोठी गर्दी होऊन घर भरणार होते. वाढदिवसाचा दिवस उजाडला. घरात सकाळपासून तयारी सुरू होती. दुपारनंतर एक एक पाहुणे येण्यास सुरुवात झाली. सायंकाळी घर अगदीच पाहुणे मंडळींनी भरून गेलं होतं.
शेवटी केक कापण्याच्या निमित्ताने सगळे एकत्र आले, यावेळी वैष्णवी तयारी करून बसलेली होती. याचवेळी तिला कुलरचा तीव्र झटका बसला आणि त्यामुळे ती बेशुद्ध झाली. काही वेळात कुटुंबीयांनी तिला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. डॉक्टरांचे शब्द कानावर पडताच तिच्या आई-वडिलांनी हंबरडा फोडला. उपस्थित नागरिकांच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. परिसरातील नागरिकांनी देखील रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. मात्र तिचे निधन झाल्याचे कानावर पडताच अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऐन वाढदिवसाला हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने परिसर सुन्न झाल्याचे पाहायला मिळाले.
हेही वाचा: