Jalgaon JMC : जळगाव मनपा आयुक्तांच्या (Jalgaon Mahapalika) मनमानी कारभाराला कंटाळून सर्व पक्षीय नगरसेवकांच्या मागणीवरून महापौर जयश्री महाजन यांनी आज महासभा आयोजित केली होती. मात्र या महासभेकडे 90 टक्के नगरसेवकांनी पाठ फिरविल्याने कोरम अभावी महासभा तहकूब करण्यात आली. त्यामुळे महासभेचे आयोजन केवळ फार्स ठरला असल्याची चर्चा सुरू आहे. 
 
जळगाव मनपामध्ये गेल्या काही महिन्यापासून मनपा आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये (Corporates) एकमेकांविषयी नाराजी नाट्य सुरू असल्याचं पाहायला मिळत होते.  मनपा आयुक्त विद्या गायकवाड या विकास कामासाठी नगरसेवकांना सहकार्य करत नसल्याचा नगरसेवकांचा आरोप होता. यातूनच नगरसेवकांनी आयुक्त यांची बदली करण्यासाठी उपोषण सुरू केले होते. यात सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकही सहभागी झाल्याने हा विषय राज्यभर चर्चेचा विषय बनला होता. मनपा आयुक्त यांच्या कारभाराबाबत सर्वच पक्षीय नगरसेवकांची नाराजी पाहायला मिळत असल्याने त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करण्याच्या हालचालींना वेग आला होता. त्यासाठी महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महासभेचे (Mahasabha) आयोजन करण्यात आले होते. 


सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना उपोषणाला बसावे लागणे, त्याचबरोबर मनपा आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव पारित करणे हे सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने अडचणीचा विषय बनू शकत असल्याने मंत्री गिरीश महाजन (girish Mahajan) आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी तातडीने नगरसेवक आणि आयुक्त यांच्यामध्ये बैठक घडून आणली. त्यावर समझोता घडविल्याने मनपा आयुक्तावर अविश्वास ठराव मागे घेतला जाईल, असे गिरीश महाजन यांनी कालच जाहीर केल्याने आज होणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव बारगळणार असल्याने 75 पैकी सत्तर नगरसेवकांनी या महासभेकडे पाठ फिरविली. कोरम अभावी ही महासभा तहकूब करण्याची वेळ महापौरांवर आली. त्यामुळे या सभेत आयुक्तांवर अविश्वास ठराव पारित होऊ शकला नसल्याने ही सभा केवळ फार्स ठरल्याचे पाहायला मिळाले आहे. 


बैठकीनंतरही नाराजीचा सूर


मंत्री गिरीश महाजन यांनी डॉ. अश्विन सोनवणे सह भाजपच्या नगरसेवकांचे म्हणणे ऐकून घेतले. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिंदे गटाच्या नगरसेवकांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर सायंकाळी अजिंठा विश्रामगृहावर आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना बोलावून घेण्यात आले. दोन्ही मंत्री आमदार सुरेश भोळे आणि मंगेश चव्हाण या दोघांमध्ये बंद दारावर चर्चा झाली. त्यानंतर गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन अविश्वास प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. मात्र अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यानंतरही आजच्या महासभेसाठी नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने चर्चांना उधाण आले आहे.


 


ईतर संबंधित बातम्या : 


Doctor Suicide : राज्यातला टॉपर विद्यार्थी, मात्र जळगावच्या तरुण डॉक्टरनं स्वतःला संपवलं, केईम हॉस्पिटलमधील घटना