Jalgaon: चक्क 33 लाखांची साबणं घेऊन ट्रक चालक फरार, जळगावात दोघांविरोधात गुन्हा
jalgaon latest Marathi News Update: 18 टन 100 किलो वजनाचे सुमारे 33 लाख रुपयांची साबणं चोरीला, दोघांविरोधात गुन्हा दाखल

jalgaon latest Marathi News Update: संतूर साबणाचा ट्रक चोरल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी ट्रक चालक आणि मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ट्रकमध्ये 33 लाख रुपयांची संतूप साबणं होती, असं प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. चोरीच्या या घटनेची जळगावमध्ये चर्चा सुरु आहे.
33 लाख रुपये किंमतीचा संतूर साबणाचा ट्रक घेऊन फरार झाल्यामुळे ट्रक चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटने संदर्भात जळगाव जिल्ह्यात अमळनेर पोलिसात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. अमळनेर शहरातील विप्रो कंपनीतील सुमारे 33 लाखाचा संतूर साबण घेऊन निघालेला ट्रक सांगितलेल्या ठिकाणी न पोहचल्याने अमळनेर पोलिसात दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की विप्रो कंपनीचा साबणाचा माल तुमकुर (कर्नाटक) या राज्यात पोहचविण्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट ह्या कंपनीला कॉन्ट्रक्ट दिलं होतं. त्यासाठी
आर जे 11 जी ए 8138 ही गाडी चालक कैलाश श्रीराम गुजर रा.हर्षलो का खेडा पो.भानूनगर ता.जहाजपूर जि.भिलवाडा राजस्थान व मालक पुष्पेंद्रसिंग सुदानसिंग चहर रा.मुरलीविहार,देवरौठा शाहगंज,आग्रा उत्तरप्रदेश यांचा मालकीचा ट्रक भाड्याने घेतला होता. 4 जानेवारी रोजी सदरील वाहनात विप्रो कंपनीतून 10 टन 100 किलो वजनाचा संतूर साबण तुमकुर (कर्नाटक)येथे पोहचण्यासाठी मामा ट्रान्सपोर्ट मार्फत 62 हजार 445 रुपये भाडे ठरवून गाडी भरण्यात आली होती. या कामी चालक आणि मालक यास 50 हजार रुपये देऊन गाडी रवाना करण्यात आली होती. नऊ जानेवारी रोजी गाडी तुमकुर येथे पोहचणे आवश्यक होते. मात्र माल त्याठिकाणी पोहचला नसल्याने, चालक आणि मालक यांच्याशी संपर्क केला असता दोघांचे फोन बंद येत आहेत. त्यामुळे फसवणूक झाल्याचं लक्षात आले आहे, ट्रक चालक आणि मालक यांनी ठरवून ट्रक मधील 980 बॉक्स सुमारे 18 टन 100 किलो वजनाचे सुमारे 33 लाख 2 हजार 678 रुपये किमतीचा संतूर साबण माल अपहार केल्याचे दिसून आले. त्यामुळे अनिलकुमार माईसुख पुनिया लोडिंग मनेजर विप्रो यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून चालक आणि मालक या दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दोघांविरोधात भादवी कलम 406,407,420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करत आहेत.























