भाजपचे संकटमोचक कसे झालात? अवधूत गुप्तेंच्या प्रश्नांना गिरीश महाजन यांची उत्तरे
Girish Mahajan : अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तरे दिली आहेत.
Girish Mahajan : भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात जामनेर येथे भाऊबीज निमित्त प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अवधूत गुप्ते यांनी गिरीश महाजन यांची मुलाखत घेतली. अवधूत गुप्ते यांच्या रोखठोक प्रश्नांना मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तरे दिली आहेत. या मुलाखतीमधून गिरीश महाजन यांचा राजकीय प्रवास समोर आला आहे. तसेच गिरीश महाजन यांच्या राजकीय संघर्षावर झेंडा-2 हा चित्रपट करणार असल्याची घोषणा यावेळी प्रसिद्ध गायक दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांनी केली आहे. यावेळी साधना महाजन यांनाही काही प्रश्न विचारण्यात आले.
आमदारकीसाठी पहिलीच निवडणूक होती. त्यावेळी माझ्या खिशात पैसे सुद्धा नव्हते. मात्र माझे प्रतिस्पर्धी उमेदवार ईश्वर बाबूजी जैन हे लोकांना साखर वाटत होते.. मात्र याही परिस्थितीत माझा विजय झाला व मोठ्या मताधिक्याने मी निवडून आलो. यानंतर सलग सहा वेळा मी मोठ्या मताधिक्याने निवडून आलो आहे. हे मला जनतेन भरभरभरून प्रेम दिलं. या प्रेमामुळेच हे शक्य झालं.
आजच्या निवडणुकीपेक्षा पूर्वीच्या निवडणुकांची ही आठवण यावेळी गिरीश महाजन सांगितली. पूर्वी मुरमुरे, कांद्याचे पोते घेऊन सायकलीवर निवडणुकांसाठी प्रचाराला जात होतो, मात्र आताचा काळ बदलला आहे. आता धाबे , हॉटेल लागतात. तसेच कार्यकर्त्यांनाही गाड्या एसी लागतात. पण माझे कार्यकर्ते माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे तसेच माझ्यावर जीव ओवाळून टाकणारे आहेत. सुरुवातीपासून एकाच पक्षाचा झेंडा घेतला तो म्हणजे हिंदुत्वाचा झेंडा, भाजपचा झेंडा. इथल्या नगरपालिकेवर 29 चे 29 सदस्य हे भाजपचे आहेत. हे महाराष्ट्रात फक्त जामनेर तालुक्यात आहे.
यावेळी साधना महाजन उत्तर देण्याआधीच गिरीश महाजन यांनी उत्तर दिले की तुम्हाला कोणी सांगितलं की ही कटकट करत नाही, असे सांगितलं. तर साधना महाजन म्हणाल्या की, 'मी अजिबात कटकट करत नाही हे कार्यकर्त्यांना सुद्धा माहित आहे. ' माझ्या आजपर्यंतच्या राजकीय यशात कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच पत्नी साधना महाजन यांचाही मोठा वाटा असल्याचे यावेळी गिरीश महाजन म्हणाले. माझ्यापेक्षा साधना महाजन मतदारसंघात जास्त फिरतात.. जामनेर मतदार संघात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुल कबड्डीचे मैदान धावण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक असं तयार करण्याचं माझं स्वप्न असल्याचे यावेळी गिरीश महाजन म्हणले.
यात माझा मोठा हात आहे असं म्हणता येणार नाही, मात्र मी खारीचा वाटा उचलत असतो. मला संकटमोचन काही म्हटले जाते मात्र याला कारणही तसेच आहे. मराठा मोर्चा असो कुठलाही मोर्चा असो मोठा आंदोलन असो त्याला मी सामोरे जातो. कारण देवेंद्र फडणवीस यांचा तसेच पक्षाचा माझ्यावर मोठा विश्वास आहे. यामुळेच मला ट्रबल शूटर ऑफ बीजेपी असं सुद्धा म्हटलं जात होतं. यावेळी जे घडलं त्याबद्दल मी फार बोलणार नाही, कारण ते सर्वांना माहिती आहे. मात्र सरकार बदललं त्याचा मला मोठा आनंद आहे तसेच जनतेलाही त्याचा आनंद आहे.
शालेय जीवनात मी कबड्डी, कुस्ती खेळायचो. मी ऑलराऊंडर होतो. तेव्हापासून मी शर्यत जोपासली आहे. आजही मी धावतो, व्यायाम करतो.. मला कुठलाही व्यसन नाही. आणि त्यामुळेच मी आताच्या पुढाऱ्यांमध्ये सीनियर पुढारी वाटत नाही. व्यसनांपासून सर्वांनी दूर राहिले पाहिजे असेही यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थिताना सांगितलं.
वाईट गोष्ट काहीच नाहीत, असे साधना महाजन यांनी सांगितलं.
गिरीश महाजन यांनी आमच्यासाठी थोडासा वेळ द्यावा आणि स्वतः जेवण आणि झोप वेळेवर करावी, असे साधना महाजन म्हणाल्या.