एक्स्प्लोर

Indrayani Kundmala bridge collapse: प्रवाहात वाहवत गेलो, पोहता येत असल्यानं स्वात:ला वाचवू शकलो, पण..; इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी घटनाक्रम सांगितला 

Pune Rain News : इंद्रायणी नदीत ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार. कोणी मिसिंग नाहीच, पण खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी फोन द्वारे दिली आहे.

Pune Rain news: मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर असणाऱ्या कुंडमळा पूल कोसळून (Indrayani Kundmala bridge collapse) रविवारी अनेक पर्यटक वाहून गेले होते. हा पूल कोसळला तेव्हा याठिकाणी तब्बल 100 पर्यटक उपस्थित असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) कालच्या बचावकार्यात 51 जणांना नदीतून बाहेर काढले होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.अशातच आता इंद्रायणी नदीत ड्रोन द्वारे पाहणी केली जाणार. कोणी मिसिंग नाहीच, पण खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी फोन द्वारे दिली आहे. तर दुसरीकडे कुंडमळा येथून एक किलोमीटरवर एक बोट नदीत सोडली असून शेलरवाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. खबरदारी म्हणून हे सर्च ऑपरेशन केलं जातंय.

इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या वैभवने काय सांगितलं?

अशातच या इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्यांनी या दुर्दैवी घटनेचा आणि ते कसे बचावले याबाबतचा घटनाक्रम सांगितला आहे. त्यातीलच एक वैभव उपाध्ये आणि वैशाली उपाध्ये आणि त्यांचे मुलं या ठिकाणी गेले होते. त्यातील वैभव अत्यंत अत्यावस्थ आहेत. वैभव हे अडीच तास पाण्यात होते. यावेळी ते  पाण्यात वाहून जात जाता वाचले. त्यांच्या पायात देखील काही लोक अडकले होते. त्यांचा मुलगा सय्यम आणि  सलोनी हे दोघे देखील होते. त्यात सय्यम याला पोहता येत असल्याने तो 200 मीटर गेल्यावर वाचला. त्यानंतर त्याने स्वत:ला वाचवलं असल्याचे ते म्हणाले.

..त्यावेळी पूल हलत होता, अन् क्षणात पूल कोसळला 

तर त्यातील आणखी एक व्यक्ति गणेश पवार यांनी देखील या घटनेचा प्रसंग सांगितला आहे. यावेळी ते म्हणाले की, मी दुचाकीवर त्या पुलावर होतो, त्यावेळी पर्यटनासाठी आलेले दुचाकीस्वार समोरासमोर आले. त्यामुळं पर्यटक अडकून राहिले. त्यानंतर पूल हलत होता, अशात हा पूल कोसळला. मी लोखंडी पुलाला पकडून स्वतःची सुटका करून घेतली, त्यानंतर 3-4 पर्यटकांना ही बाहेर काढलं. असे ते म्हणाले. 

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?

- इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
- पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन् ते रविवारी कुठं होते?
- हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
- गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
- आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष ही दिरंगाई कोणामुळं?

आणखी वाचा

इंद्रायणीच्या कुंडमळा पुलावरुन नदीत पडलेले आणखी किती जण बेपत्ता? महत्त्वाची अपडेट, एनडीआरएफचे जवान पुन्हा नदीत उतरणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका

व्हिडीओ

Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
Special Report Raut VS Thackeray : राऊतांचे ठाकरेंनाच रोखठोक सल्ले, कार्यपद्धतीवर राऊतांना प्रश्न?
Special Report Mahayuti On Satara ZP :दोघांचही लक्ष्य सातारा झेडपीचा अध्यक्ष, साताऱ्याचं समीकरण काय?
Special Report Harshwardhan Sapkal : पुण्यात घमासान , पुण्यात भाजप वि.काँग्रेस संघर्ष पेटला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Interview : नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
नफ्यावर कमी अन् गुणवत्तेवर जास्त लक्ष द्या; पंतप्रधान मोदींचा विकसित भारतासाठी खासगी क्षेत्राला संदेश
Ganesh Naik : या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
या भस्मासुरांनी 10 वर्षे लुटल्यानेच महाराष्ट्र मागे राहिला, यांची जागा जेलमध्ये; गणेश नाईकांचा शिंदे पिता-पुत्रांवर वार
BMC : मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
मुंबईचा विरोधी पक्षनेता ठरणार, महापालिकेच्या स्थायी समितीची चावी भाजपकडे की शिंदेंकडे? महापौर घोषणा करणार
Harsha Bhogle: 'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
'पूर्वी मनात नेहमीच एक प्रकारची धडधड असायची, आता भारत-पाकिस्तान सामन्यांना पैसा आणि राजकारण्यांनी हायजॅक केलं' हर्षा भोगलेंची सडकून टीका
Ishan Kishan: इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
इशान किशनची माॅडेल गर्लफ्रेंड अदिती आहे तरी कोण? आजोबा म्हणाले, नातवाची पसंती तीच आमची पसंती!
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
पहिल्यांदा शरीराला लकवा अन् मग भयावह पद्धतीने मृत्यू! दक्षिण अमेरिकेतील डार्ट बेडकांच्या कातडीचा वापर; पुतीन यांनी कट्टर राजकीय विरोधकाला कसं संपवलं? पाच देशांनी थरकाप उडवणारी कहाणी सांगितली
Pune BJP Congress Rada: पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
पुण्यात भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; आंदोलन अन् दगडफेक, कार्यकर्ते रक्तबंबाळ, गाड्या फुटल्या, आता काँग्रेसही आक्रमक
Ishan Kishan: संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
संधी मिळताच इशान किशन मैदानात धुमाकूळ घालत असतानाच आता लग्नाची बातमी धडकली! त्या माॅडेलचं नाव समोर येताच आजोबा नातवाला म्हणाले...
Embed widget