Indian Railways New Rules : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, वेटिंग लिस्ट तिकीटाबाबत महत्वाचा बदल, पण आता ही गोष्ट करता येणार नाही
Indian Railways New Rules: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तात्काळ तिकिट बुकिंगसह वेटिंग लिस्ट तिकीटाबाबत महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तात्काळ तिकिट बुकिंगसह वेटिंग लिस्ट तिकीटाबाबत महत्वाचा बदल करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केल्याप्रमाणे 1 जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. तर, 15 जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. या सोबतच भारतीय रेल्वेने वेटिंग लिस्टवरील प्रवाशांसाठी नवे नियम लागू केले आहेत. ज्यामध्ये आता प्रवाशांना त्यांचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही, याची माहिती ट्रेन सुटण्याच्या 24 तास आधीच मिळणार आहे. जे की यापूर्वी ही माहिती फक्त 4 तास म्हणजेच आरक्षण चार्ट तयार केल्यावर मिळत होती. परिणामी या नव्या नियमामुळे वेटिंग तिकिटधारकांना शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. सोबतच या नवीन निर्णयाचा आता लाखो रेल्वे प्रवाशांना फायदा होणार आहे.
तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणते बदल?
तात्कळ तिकिट बुकिंग करताना येणाऱ्या अडचणींबाबत प्रवाशांकडून सातत्यानं आवाज उठवला जात होता. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवे बदल जाहीर केले आहेत. हा नवा नियम लवकरच देशभर लागू केला जाणार आहे. तत्काळ तिकिट बुकिंगच्या नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तत्काळ तिकिटे पूर्वीप्रमाणे प्रवासाच्या एक दिवस आधीच बुक करता येतील व त्यांची कन्फर्मेशन प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. रेल्वेच्या तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असल्याचं जाहीर केलं. या सुधारणा यूजर्सचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि तात्काळ तिकिटांचा गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत.
मागच्या दीड वर्षात वैतरणा ते मिररोड रेल्वे स्थानकादरम्यान 284 जणांचा बळी
मुंब्रा रेल्वेस्थानाकातील दुर्घटने नंतर पश्चिम रेल्वे वरील प्रवास ही जीवघेणा झाला आहे. वैतरणा ते मिररोड रेल्वे स्थानकादरम्यान मागच्या दीड वर्षात 284 जणांचा बळी गेले आहेत. तर 286 प्रवासी लोकलमधून पडून जखमी झाले असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून मिळाली आहे. 284 मृत्यू झालेल्या पैकी 171 जणांचा मृत्यू हा लोकलच्या धडकेत, 61 जणांचा लोकल मधून तोल जाऊन पडून मृत्यू झाला आहे. तर 52 जणांचा इतर कारणामुळे मृत्यू झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांकडे आहे. 286 रेल्वे प्रवासी जखमी पैकी 180 रेल्वे प्रवासी हे धावत्या लोकलमधून पडून जखमी झाले आहेत. मिररोड ते वैतरणा अशी 31 किलोमीटर रेल्वे पोलीस ठाण्याची हद्द असून, या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरारोड, वसई, नालासोपारा, विरार, नायगाव, वैतरणा ही रेल्वे स्थानकांचा समावेश असून, दिवसाला 12 ते 15 लाख प्रवासी लोकल ने प्रवास करतात.
इतर महत्वाच्या बातम्या
























