Who Is Jyoti Malhotra : युट्युबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळल्या; पाकिस्तानी गुप्तचर एजंटांशी संपर्क ठेवत संवेदनशील माहिती शेअर केल्याचा आरोप
Who Is Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती आणि दानिशने तिला पाकिस्तानला पाठवले होते.

Who Is Jyoti Malhotra : हरियाणातील ट्रॅव्हल युट्यूबर ज्योती मल्होत्राला (Youtuber Jyoti Malhotra Arrested) पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत पंजाब आणि हरियाणातील मालेरकोटला येथून एकूण 6 पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तान उच्चायुक्तालयात काम करणाऱ्या दानिश नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती आणि दानिशने तिला पाकिस्तानला पाठवले होते. ज्योती मल्होत्रा स्वतःचे ट्रॅव्हल चॅनल चालवते, ती पाकिस्तानलाही गेली होती आणि पाकिस्तानमध्ये अनेक गुप्तचर माहिती शेअर करत होती.
तिचा 'ट्रॅव्हल विथ-जो' नावाचा युट्यूब चॅनल
चौकशीदरम्यान ज्योती मल्होत्रा हिने पोलिसांना सांगितले की तिचा 'ट्रॅव्हल विथ-जो' नावाचा युट्यूब चॅनल आहे. ती पासपोर्टधारक आहे आणि 2023 मध्ये पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी ती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात गेली होती, जिथे तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ दानिशशी झाली. तिने अहसान-उर-रहीम उर्फ दानिशचा मोबाईल नंबर घेतला होता आणि नंतर त्याच्याशी बोलू लागली.
View this post on Instagram
पाकिस्तानला प्रवास केला
त्यानंतर ती दोनदा पाकिस्तानला गेली जिथे दानिशच्या सांगण्यावरून ती त्याचा ओळखीचा अली अहवानला भेटली, जिथे अली अहवानने तिच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. पाकिस्तानात अली अहवानने पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत तिची भेट घडवून आणली.
गुप्तचर माहिती पाठवली
तिथं ज्योती शकीर आणि राणा शाहबाज यांनाही भेटले. तिने शकीरचा मोबाईल नंबर घेतला आणि तो तिच्या मोबाईलमध्ये जट राधवान या नावाने सेव्ह केला जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. त्यानंतर ती भारतात परत आली. त्यानंतर ती व्हॉट्सअॅप, स्नॅप चॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे त्या सर्वांशी सतत संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहितीची देवाणघेवाण करू लागली.
ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात आली
ज्योती दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी अहसान-उर-रहीम उर्फ दानिशला अनेक वेळा भेटत राहिली. ज्योतीच्या चौकशीतून असे दिसून आले आहे की ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती. ज्योतीने संशयास्पद कारवाया करून आणि शत्रू देश पाकिस्तानच्या एका नागरिकासोबत भारतीय गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करून भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचा गुन्हा केला आहे, ज्याला भारत सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली पर्सोन-नॉन-ग्राटा घोषित केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















