एक्स्प्लोर
SBI अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्यांचा पगार किती?
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या 50 बँकांच्या यादीत समावेश असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांना बँकेकडून जो पगार देण्यात येतो, तो ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण एसबीआय अध्यक्षांचा पगार देशातील एक नंबरची खासगी बँक आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षांच्या पगारापुढे काहीच नाही, अशी माहिती समोर आली आहे.
वेगवेगळ्या बँकांच्या वार्षिक अहवलातील माहितीनुसार अरुंधती भट्टाचार्य यांना 2016-17 या वर्षात 28.96 लाख रुपये वार्षिक वेतन देण्यात आलं. तर याच काळात आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ चंदा कोचर यांना 2.66 कोटी रुपये मूळ वेतन मिळालं. एवढंच नाही तर कोचर यांना 2.2 कोटी रुपये परफॉर्नमन्स बोनही मिळणार आहे.
खासगी बँकेच्या अध्यक्षा चंदा कोचर यांचा पगार यापर्यंतच मर्यादित नाही. त्यांना 2.43 कोटी रुपये भत्ता देण्यात आला. म्हणजेच त्यांना वर्षाला एकूण 6.9 कोटी रुपये एवढं वेतन देण्यात आलं. म्हणजेच देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेच्या अध्यक्षा असलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांना वर्षाला 30 लाखांपेक्षाही कमी पॅकेज आहे. तर आयसीआयसीआय बँकेच्या अध्यक्षांना 6 कोटींपेक्षा जास्त वार्षिक पॅकेज आहे. म्हणजेच या दोन्ही बँक प्रमुखांच्या पगारात 19 टक्क्यांचं अंतर आहे.
अॅक्सिस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ शिखा शर्मा यांना 2016-17 या आर्थिक वर्षात 2.7 कोटी रुपये मूळ वेतन देण्यात आलं. याशिवाय त्यांना 1.35 कोटी रुपये व्हेरिएबल पे आणि 90 लाख रुपये भत्ता देण्यात आला.
एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी यांना 10 कोटी रुपये वार्षिक पॅकेज आहे. तर त्यांच्याकडे 57 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या स्टॉकचाही पर्याय आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच बँकातील मोठ्या अधिकाऱ्यांना कमी वेतन मिळत असल्याचा मुद्दा उचलून धरला होता. बँकेच्या टॉप अधिकाऱ्यांसाठी मिळणारा हा पगार अत्यंत कमी आहे. सरकारी बँका टॉप अधिकाऱ्यांना कमी आणि त्यांच्या खालील पदावर असलेल्या अधिकाऱ्यांना जास्त पगार देतात, असं रघुराम राजन म्हणाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement