अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न, तरीही जुन्या आशिकमध्ये चुपके चुपके फोनवरून मग्न; नवऱ्याला रंगेहाथ सापडताच बायको प्रतीक्षानं..
रामने समझोत्याचा व्हिडिओही बनवला होता. ज्यामध्ये प्रतिक्षा आणि तिचे वडील दिसत होते. व्हिडिओमध्ये प्रतिक्षा म्हणाली होती की, जर या घरात काही घडले तर ती जबाबदार असेल.

देशामध्ये विवाहित महिलांकडून नवऱ्याला संपवण्याची मालिका सुरूच असताना तसेच लग्नानंतर काही दिवसांमध्येच अनैतिक संबंध ठेवण्याचे प्रकार सुद्धा उघडकीस येत असताना आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मालिकेमध्ये आता अवघ्या पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बायकोनं नवऱ्याला चुना लावत जुन्या प्रियकरासोबत पलायन केलं आहे. इतकेच नव्हे तर त्या महिलेनं सोबत पाच लाख रुपये रोख आणि साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. गेल्या 18 दिवसांपासून शोधूनही सापडत नसल्याने सासूने फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून फरार महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे.
लग्नानंतरही जुन्या प्रियकरासोबत संबंध सुरुच
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कानपूरमधील रामचा विवाह प्रतीक्षा तिवारीशी झाला. मात्र, त्या प्रतीक्षाचे लग्नानंतरही जुन्या प्रियकरासोबत (मनीष) सबंध सुरुच होते. सासरी आल्यानंतर सुद्धा त्याच्याशी प्रतीक्षा चोरून चोरून फोनवरून बोलत होती. नवऱ्याने रंगेहाथ पडकल्यानंतर दोन परिवारांची पंचायत सुद्धा पार पडली. त्यामुळे त्या महिलेनं आपली चूक कबूल केली होती. त्यानंतर म्हणाली होती की आता तुम्ही सांगाल त्या पद्धतीने मी ऐकेन. मात्र, काही दिवसांनी पुन्हा जुन्या प्रियकराशी बोलणं सुरूच ठेवले. त्यानंतर 11 एप्रिल रोजी थेट पळून गेली. गेल्या 18 दिवसांपासून शोध सुरू असताना ती सापडलीच नाही. शेवटी 29 एप्रिल रोजी सासूनं पोलीस ठाण्यामध्ये सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली.
रामने समझोत्याचा व्हिडिओही बनवला
रामने समझोत्याचा व्हिडिओही बनवला होता. ज्यामध्ये प्रतिक्षा आणि तिचे वडील दिसत होते. व्हिडिओमध्ये प्रतिक्षा म्हणाली होती की, जर या घरात काही घडले तर ती जबाबदार असेल. यानंतर प्रतिक्षा घरात व्यवस्थित राहू लागली. सर्व काही सामान्य झाले. कोणालाही कल्पना नव्हती की ती असे काही करू शकते. रामने सांगितले की, प्रतिक्षा घरी आल्यानंतर तो पुण्याला परतला. तिची आई अशिक्षित आहे. त्यानंतर 11 एप्रिल रोजी प्रतिक्षा मनीषसोबत पळून गेली. जाताना तिने घरातून 5.50 लाख रुपये रोख आणि 3.38 लाख रुपयांचे दागिने सोबत नेले. मनीषविरुद्ध जसवंत नगरमध्येही फौजदारी गुन्हे दाखल आहेत. तो त्याच्यासोबत पिस्तूल ठेवतो. दक्षिण पोलिस आयुक्त महेश कुमार म्हणाले की, गुजैनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सीडीआरद्वारे महिलेचे स्थान शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच महिलेचा शोध घेतला जाईल आणि रोख रक्कम आणि दागिने जप्त केले जातील.
इतर महत्वाच्या बातम्या























