एक्स्प्लोर
Advertisement
लग्नासाठी धर्मपरिवर्तन केलेल्या मुस्लिम तरुणाची साथ हिंदू तरुणीने सोडली
23 वर्षीय अंजली जैनने आपल्याला पालकांसोबत राहण्याची इच्छा असल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितलं.
नवी दिल्ली : लग्न करण्यासाठी धर्मपरिवर्तन केलेल्या मुस्लिम तरुणाची साथ हिंदू तरुणीने सोडली. 23 वर्षीय अंजली जैनने आपल्याला पालकांसोबत राहण्याची इच्छा असल्याचं सुप्रीम कोर्टात सांगितलं. छत्तीसगडमध्ये या दाम्पत्याचं लग्न झालं होतं.
33 वर्षीय मोहम्मद इब्राहिम सिद्दीकी याने हिंदू धर्मात परिवर्तन केलं. आर्यन आर्य असं नाव धारण करुन त्याने अंजली जैनसोबत लग्न केलं होतं. मात्र अंजलीच्या पालकांनी तिला आर्यनसोबत राहू देण्यास नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहचलं होतं.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि जस्टिस डीव्हाय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर अंजलीने जबाब नोंदवला. अंजलीची इच्छा आणि ती 18 वर्षांवरील असल्याचं लक्षात घेत न्यायालयाने तिला पालकांसोबत जाण्याची अनुमती दिली.
अंजली आणि सिद्दीकी लग्नापूर्वी दोन-तीन वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. 23 फेब्रुवारी 2018 ला त्याने धर्मपरिवर्तन केलं. 25 फेब्रुवारीला छत्तीसगडच्या रायपूरमधील आर्य समाज मंदिरात दोघं लपूनछपून विवाहबंधनात अडकले.
लग्नानंतर अंजली माहेरी आली, मात्र तिने पालकांना लग्नाविषयी कल्पना दिली नाही. काही दिवसांनी तिच्या आई-वडिलांना या गोष्टीची कुणकुण लागली. त्यावेळी अंजलीने कुटुंबाला न सांगता घर सोडण्याचा निर्णय घेतला.
30 जूनला अंजलीने घरातून पळ काढला, मात्र पतीशी तिची भेट होण्यापूर्वीच पोलिसांनी तिला शोधलं. तिची रवानगी सरकारने स्थापन केलेल्या सखी महिलाश्रमात करण्यात आली.
अंजलीला पालकांसोबत राहायचं आहे, असा तिचा खोटा जबाब पोलिसांनी नोंदवल्याचा आरोप आर्यनने केला होता. त्याने हायकोर्टात धाव घेतली, तेव्हा 30 जुलैला हजर राहण्याचं समन्स पोलिसांनी अंजली आणि तिच्या पालकांना बजावलं.
छत्तीसगड हायकोर्टातही आर्यनची निराशा झाली होती. अंजलीला आर्यनसोबत राहू देण्यास छत्तीसगड हायकोर्टाने नकार दिला होता. त्यामुळे या निर्णयाविरोधात आर्यनने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
क्रिकेट
Advertisement