एक्स्प्लोर

Kerala Blast: टिफिनमध्ये ठेवलेला बॉम्ब; घटनास्थळावरुन तारा, बॅटरी सापडल्या, केरळ बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट

Blast in Kerala: एकापाठोपाठ झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Kerala Blast Update : केरळच्या (Kerala News) एर्नाकुलममध्ये एकापाठोपाठ एक असे साखळी स्फोट (Kerala Blast Updates) झाले आहेत. स्फोटांमध्ये एकाचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी एकापाठोपाठ तीन बॉम्बस्फोटांनी केरळ हादरलं. केरळमधील एर्नाकुलम येथे एका ख्रिश्चन प्रार्थना सभेत तीन स्फोट झाले आणि एकच गोंधळ उडाला. स्फोटात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. केरळमधील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हे स्फोट झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना घटनास्थळावर स्फोटात वापरलेल्या तारा, बॅटरी आणि इतर संशयास्पद वस्तुही सापडल्या आहेत. हा बॉम्ब टिफिन बॉक्समध्ये ठेवल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

एकापाठोपाठ 3 ते 4 ब्लास्ट 

कन्व्हेन्शन सेंटरमधील तीन दिवसीय कार्यक्रमाचा आज शेवटचा दिवस असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. स्फोट झाला तेव्हा सभागृहात दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. एकापाठोपाठ एक 3 ते 4 स्फोट झाले, ज्यात अनेक लोक जखमी झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

मुंबई, पुण्यात अलर्ट

केरळमध्ये आज सकाळी झालेल्या स्फोटानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात सुरक्षेच्या सर्व उपाययोजना करत आहेत. सर्व महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात आली आहे. कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पूर्णपणे काळजी घेण्यात आलेली आहे. 

दिल्लीहून एनएसजी रवाना 

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत दिल्लीहून एनएसजी बॉम्बशोधक पथकही केरळला रवाना करण्यात आलं आहे. एनएसजीच्या या टीममध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे, जे घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची चौकशी करतील. या स्फोटानंतर समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सगळीकडे फक्त आग आणि धूर दिसत आहे. हा स्फोट कसा झाला आणि कोणी घडवला, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या घटनेबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशीही चर्चा केली आहे.

स्फोटांचा तपास NIA करणार 

केरळमधील साखळी बॉम्बस्फोटांचा तपास एनआयए (NIA) करणार आहे. केंद्रीय तपास यंत्रणा एनआयए लवकरच घटनास्थळी पोहोचून तपासाला सुरुवात करणार आहे. एनआयएची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचणार आहे. साखळी स्फोटांचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

केरळमधील स्फोटाबाबत गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री विजयन यांच्याशी फोनवर बोलून सर्व प्रकारची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. गृहमंत्र्यांनी एनआयएला घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Kerala Blast: केरळमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget