एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
...तर 'मोटरसायकल' अखिलेश यादवांचं निवडणूक चिन्ह?
लखनऊ : उत्तर प्रदेशातील बाप-बेट्याची लढाई आता अंतिम टोकाला पोहोचली आहे. समाजवादी पक्षाच्या सायकल चिन्हासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. मुलायम सिंह यादव यांच्या गटाने सायकल चिन्हावर दावेदारी सांगितल्यानंतर, आज अखिलेश यादव गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
समाजवादी पार्टीच्या आमदारांच्या पाठिंब्यावर अखिलेश स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी भीती मुलायम यांना आहे. त्यामुळे सायकलवर स्वार होण्यासाठी दोन्ही गटांमध्ये अटीतटीची लढाई सुरु आहे.
मुलायम की अखिलेश, सायकलवर कोण स्वार होणार?
तर 'दुचाकी' अखिलेश यांचं चिन्ह? दरम्यान अखिलेश यांना सायकलचं चिन्ह न मिळाल्यास ते मोटरसायकलचं चिन्ह स्वीकारु शकतात, अशी माहिती सुत्रांची माहिती आहे. निवडणूक आयोग सायकल हे चिन्ह जप्त करु शकतो, याची माहिती अखिलेश यांना आहे. त्यामुळे अखिलेश गटाने दुचाकी या निवडणूक चिन्हासाठी तयारी केली आहे.उत्तर प्रदेशात 'यादवी', अखिलेश यांच्याकडे सपाची सर्व सूत्र
अखिलेश यांच्याकडे पक्षाची धुरा मुलायम सिंह यादव यांनी निवडणूक आयोगासमोर सायकलवर दावा केला आहे. आता अखिलेश गटाकडून रामगोपाल यादव निवडणूक आयोगाकडे जाणार आहेत. विशेष राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर झालेल्या प्रस्तावाची माहिती निवडणूक आयोगाला देईल. सपाच्या कार्यकारिणीत मुलायम सिंह यांना हटवून अखिलेश यादव यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवली होती.अखिलेश आणि रामपाल यादवांचं निलंबन रद्द
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
क्रीडा
राजकारण
Advertisement