एक्स्प्लोर
आदिती सिंह यांच्या कल्पनेतून पक्षातील युवतींना मिळणार ड्रेसकोड
युवतींसाठी गुलाबी, पिवळा, निळा, टीशर्ट आणि ट्राऊझर असा ड्रेसकोड देण्यात आला आहे. आदिती सिंह या रायबरेली मतदार संघाच्या आमदार आहेत. नुकतेच राहुल गांधी यांनी त्यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली होती.
सोलापूर : महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रटरी आदिती सिंह यांच्या कल्पनेतून पक्षातील युवतींसाठी ड्रेसकोड देण्यात आला आहे. युवतींसाठी गुलाबी, पिवळा, निळा, टीशर्ट आणि ट्राऊझर असा ड्रेसकोड देण्यात आला आहे. आदिती सिंह या रायबरेली मतदार संघाच्या आमदार आहेत. नुकतेच राहुल गांधी यांनी त्यांची अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरीपदी नियुक्ती केली होती.
आदिती सिंह यांची सचिवपदी नियुक्ती होताच त्यांनी अशाप्रकारच्या ट्रेसकोडची कल्पना समोर ठेवली आणि पक्षाने ती मान्यही केली. या ड्रेसकोडमुळे पक्षातील युवतींना एक वेगळी ओळख मिळणार आहे.
आदिती सिंह या प्रियदर्शिनी नावाने देशभरात मुलींना काँग्रेसशी जोडण्याच काम करतात. सोनिया गांधी यांच्याच मतदारसंघातून आदिती या आमदार आहेत. काही दिवसांपूर्वी राहुल गांधीसोबत आदिती यांचं लग्न होणार असल्याची अफवा उडाली होती. मात्र आदिती यांनी ही बातमी खोटी असल्याचं सांगितलं होत. त्या राहुल गांधी यांच्या कोर ग्रुपच्या सदस्या आहेत.
आदितींचे वडील अखिलेश सिंहही पाच वेळेस आमदार होते आणि देशात गाजलेल्या बॅडमिंटनपटू सय्यद मोदी खून खटल्यातील मुख्य आरोपीही होते. आदितीच्या वडिलांनी स्वत:च्या जोरावर पाच वेळेस या मतदार संघाचं नेतृत्व केलं होत.
कोण आहेत आदिती सिंह?
आदिती सिंह 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 90 हजारच्या फरकाने काँग्रेसकडून निवडून आल्या होत्या. 31 वर्षीय आदिती सिंह यांनी अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातून मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. आदिती या प्रियांका गांधीच्या निकटवर्तीय मानल्या जातात. मात्र त्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाची प्रशंसा केल्याने चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. सध्या त्या अखिल भारतीय महिला काँग्रेसचं काम पाहतात. तसेच प्रियदर्शनी नावाने काँग्रेसमध्ये महिलांना जोडण्याचा काम करतात. काँगेसमधील पॉवरफूल महिला म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. राहुल गांधींसोबत त्यांचं नाव जोडलं गेल्याने चांगलीच चर्चा झाली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement