Chandrashekhar Guruji : कन्स्ट्रक्शन कंपनी ते सरल वास्तू, जाणून घ्या कोण होते चंद्रशेखर गुरूजी
Chandrashekhar Guruji : कर्नाटकातील एका हॉटेलच्या रिसेप्शनवर चंद्रशेखर गुरूजी यांच्याकडेच काम करणाऱ्या दोघांनी चाकूने वार करून त्यांची हत्या केली. चंद्रशेखर गुरूजी वास्तूशास्त्राबद्दल मार्गदर्शन करत असत.
Chandrashekhar Guruji : 'सरल वास्तू'चे संस्थापक वास्तूशास्त्रज्ञ चंद्रशेखर गुरुजी यांची आज कर्नाटकातील हुबळी येथे भोसकून हत्या करण्यात आली आहे. एका हॉटेलच्या रिसेप्शनवर चंद्रशेखर गुरूजी यांच्याकडेच काम करणाऱ्या दोघांनी चाकूने वार करून त्यांची हत्या केली. चंद्रशेखर गुरूजी वास्तूशास्त्राबद्दल मार्गदर्शन करत असत. शिवाय ते सामाजिक कार्यात देखील सक्रिय होते.
सैन्यात भरती होण्याचे स्वप्न
चंद्रशेखर गुरुजी यांचे नाव चंद्रशेखर अंगडी असे होते. त्यांना सर्वजण गुरूजी म्हणत असत. चंद्रशेखर गुरूजी हे वास्तुविश्वातील एक अतिशय प्रसिद्ध नाव होते. चंद्रशेखर गुरुजींना मानव गुरू म्हणून देखील ओळखले जाते होते. त्यांचा जन्म कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी वर्गणी गोळा करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. भारतीय सैन्यात दाखल होण्याचे त्यांचे स्वप्न होते. परंतु, त्यांना सैन्यात भरती होता आले नाही.
कन्स्ट्रक्शन व्यवसायाची सुरूवात
चंद्रशेखर गुरूजी हे सिव्हिल इंजिनीअर होते. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते 1989 मध्ये मुंबईत आले. त्यांनी काही काळ कन्स्ट्रक्शन कंपनीत नोकरी केली. त्यानंतर त्यांनी स्वत:ची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू केली. सुरूवातीला कंपनीत चांगला फायदा झाला. परंतु, नंतरच्या काळात त्यांना आर्थिक फटका बसला. त्यामुळे त्यांनी कंपनी बंद केली. त्यानंतर त्यांनी वास्तूशास्त्रासंबंधी काम सुरू केले. त्यांच्या व्यवसायाच्या बांधकामादरम्यान अनेक लोकांची घरे चुकीच्या पद्धतीने बांधल्याचे त्यांनी पाहिले. त्यानंतर ते वास्तूशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी सिंगापूरला गेले. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्यांनी याच क्षेत्रात कामाला सुरूवात केली.
अनेक शहरांमध्ये कार्यालये
चंद्रशेखर गुरूजी यांनी बंगळुरू, हुबळी आणि कर्नाटकासह अनेक शहरांमध्ये त्यांची कार्यालये उघडली. चंद्रशेखर गुरूजी यांचे मुंबईत एक कॉल सेंटर देखील असल्याचे बोलले जात आहे. या कॉल सेंटरमध्ये शेकडो कर्मचारी लोकांना वास्तूबद्दल सल्ला देतात.
गावे दत्तक घेण्याचा उपक्रम
लोकांची मागणी पाहून डॉ.चंद्रशेखर गुरुजी यांनी 'सरल जीवन' नावाने एक चॅनल सुरू केला होता. या चंद्रशेखर गुरुजी अनेक खासगी चॅनलवरून वास्तूशास्त्राबाबतचा सल्ला देखील देत असत. याबरोबरच चंद्रशेखर गुरूजी हे मानव अभिवृद्धी अभियान चालव होते. या अभियाअंतर्गत त्यांनी अनेक लोकांना मार्गदर्शन केले. चंद्रशेखर गुरूजींनी गावे दत्तक घेण्याचा कार्यक्रम देखील राबवला. कर्नाटक राज्यातील ग्रामीण भागात त्यांनी शाळा सुरू केली आहे.
चंद्रशेखर गुरूजी यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एक मुलगी होती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी दुसरं लग्न केले. दुसऱ्या लग्नापासून त्यांना अपत्य नाही.