एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आधी जाऊबाई जोरात, आता भाऊ-भाऊ जोमात!

नवी दिल्ली : अगदी दोन-एक दिवसांपूर्वीच मेनका गांधी यांनी लखनौतील एका बैठकीत आपल्या जाऊबाई सोनिया गांधी यांची स्तुती केली असतानाच, आता राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यातही असंच काहीसं घडलं आहे.   देशाच्या राजकारणात गांधी कुटुंबं कायमच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आजही गांधी कुटुंबातील सदस्य राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, आता गांधी कुटुंब विस्कटलंय. कुणी भाजपमध्ये, तर कुणी काँग्रेसमध्ये.   एकीकडे सोनिया-राहुल-प्रयंका आणि दुसरीकडे मेनका-वरुण, अशी विभागणी गांधी कुटुंबीयांची झालीय. या कुटुंबातील वाद जगजाहीर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे काही घडू लागलं आहे की, गांधी कुटुंबातील कटुता संपलीय का, असा प्रश्न पडावा.   मात्र, असे अनेकदा दिसून आले आहे की, संवाद वाढवण्यासाठी आणि कटुता कमी करण्यासाठी दोन्हीकडून सकारात्मक पावलं उचलली गेली आहेत. म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं, तर वरुण गांधी यांना आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी थेट सोनिया गांधींचं घर गाठलं.   असाच एक प्रसंग कालही पाहायला मिळाल. एकाच देशात राहून, आपणं वेगवेगळ्या देशात राहत असल्यासारकं एकमेकांशी वागणं, हे राहुल आणि वरुण यांच्यातून स्पष्ट दिसून येतं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संसदीय समितीत राहुल आणि वरुण एकत्र आहेत. विशेष म्हणजे या समितीच्या बैठकीत दोघेही एकमेकांशी अनेकदा सहमतही झाले.   सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या या समितीच्या बैठकीत असे अनेक मुद्दे होते, ज्यावेळी वरुण गांधी यांनी राहुल गांधींशी सहमती दर्शवली, तर राहुल गांधी यांनी वरुण गांधींशी सहमती दर्शवली. दोघांमधील हा सुसंवाद उपस्थितांना आश्चर्याचा धक्का होता.   जेव्हा ‘एबीपी न्यूज’ने राहुल गांधींशी याबाबत बातचित केली, त्यावेळी राहुल म्हणाले, “आम्हा दोघेही तिथे एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलो होते.”   आता राहुल गांधी यांनी वरुण गांधींसोबतच्या सुसंवादाला भले औपचारिकतेचं लेबल लावलं असेल, मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते, या दोन्ही भावांमधील असे किस्से कायमच चर्चेचा विषय बनतात. कारण या दोघांच्याही कुटुंबाचं भारतीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :2 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget