एक्स्प्लोर
... त्यादिवशी रात्री 12 वा. 'यूपी'तील सर्व कत्तलखाने बंद होतील : शाह

लखनऊ : भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल, त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासून उत्तर प्रदेशमधील सर्व यांत्रिक कत्तलखाने बंद होतील, अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कत्तलखाने चालकांकडून शेतकऱ्यांचे गाय, बैल, म्हैस पळून नेले जात आहेत. त्यामुळे भाजपचं सरकार स्थापन होईल, त्यादिवशी रात्री 12 वाजल्यापासूनच सर्व कत्तलखाने बंद होतील, असं अमित शाह म्हणाले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार असून 11 मार्चला निकाल लागणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बसपाच्या मायावती यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























