एक्स्प्लोर

नोटाबंदीचा आज 49 वा दिवस, डेडलाईनचं काऊंटडाऊन सुरु

नवी दिल्ली : नोटाबंदीला 49 दिवस उलटल्यानंतरही देशभरातील लोकांचे दैनंदिन व्यवहार अजूनही सुरळीत झालेले नाहीत. ऑनलाईन व्यवहाराची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी नोटाबंदीमुळे त्रास सहन करावा लागतो आहे. शहरात बंद एटीएम मशिन्समुळेही ग्रामीण भागापेक्षा वेगळी स्थिती नाही. बँकांमध्ये आठवड्याला 24 हजार आणि एटीएममधून दिवसाला फक्त अडीच हजार रुपयेच काढण्याची मुभा आहे. त्यामुळे लोकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. शहरी भागात पेटीएम आणि इतर मोबाईल अॅपमुळं काही ठिकाणी व्यवहार थोडा सोपा झाला आहे. मात्र, ग्रामीण भागात अजूनही स्थिती जैसे थे व्हायला वेळ लागण्याची चिन्हं आहेत. कारण स्वाईप मशिनचा तुटवडा, लोकांना ऑनलाईन व्यवहारांची नसलेली सवय आणि माहिती यामुळे ग्रामीण भागात लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीही दिसून येते. काळा पैसा आणि बनावट नोटांचं रॅकेट यांविरुद्ध लढाईला बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयाच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. मात्र, जुन्या नोटा बदलण्यासाठी, बँकेत जमा करण्यासाठी आणि बँक, एटीएममधून पैसे काढण्यासाठी आरबीआयकडून वेगवेगळे नियम लावण्यात आले. त्यामुळे सामान्य लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीच्या 50 दिवसानंतर सर्वकाही आलबेल होईल, असा दावा केला खरा, मात्र आज 49 वा दिवस उजाडल्यानंतरची परिस्थिती पाहिल्यानंतर मोदींच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित राहतो आहे. लोकांचे दैनंदिन व्यवहारही अजून सुरळीत झाल्याचे दिसून येत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget