देशाची अर्थव्यवस्थेचा आणि RRR चित्रपटाचा काय संबंध आहे? केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले...
RRR Movie Collection: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, देशात 418 अब्ज डॉलर्स म्हणजेच 32 लाख कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.
RRR Movie Collection: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले की, देशात 418 अब्ज डॉलर्स म्हणजेच 32 लाख कोटी रुपयांची निर्यात झाली आहे. हे सरकारच्या उद्दिष्टापेक्षा 5 टक्के जास्त आहे. मोदी सरकारच्या योजनेंतर्गत सातत्याने निर्यात वाढवण्यावर भर दिला जात असल्याचे ते म्हणाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षात विविध क्षेत्रातील निर्यातीत लक्षणीय वाढ झाली असल्याचे ही त्यांनी सांगितलं आहे.
'आरआरआर' भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट: पीयूष गोयल
पीयूष गोयल म्हणाले की, उदाहरणार्थ, रत्ने आणि दागिन्यांची सर्वाधिक निर्यात चीनला झाली आहे. देश आत्मनिर्भरतेकडे वेगाने वाटचाल करत आहे. ते म्हणाले की, देशात दर महिन्याला 30 बिलियन डॉलर्स पेक्षा जास्त निर्यात होत आहे. तेही कोरोनाच्या दोन लाटानंतर देशाने हे यश मिळवलं आहे. 'आरआरआर' चित्रपटाचा संदर्भ देताना ते म्हणाले की, हा भारतातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे भारत देखील प्रत्येक क्षेत्रात सातत्याने यश मिळवत आहे. भारताच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट असल्याचे मी ऐकले आहे. या चित्रपटाने 750 कोटींची कमाई केली आहे. मला असे वाटते की आता भारताची अर्थव्यवस्था विक्रमी रेकॉर्ड मोडणार आहे.''
पीयूष गोयल पुढे म्हणाले की, 2019-20 मध्ये 2 लाख टन म्हणजे 500 कोटी गव्हाची निर्यात झाली. त्याच वेळी 2020-21 मध्ये 21.55 लाख टन म्हणजेच सुमारे 4000 कोटींची निर्यात झाली. 2021-22 मध्ये ते 7 दशलक्ष टनांहून अधिक म्हणजे 15,000 कोटींहून अधिक निर्यात झाली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Petrol Diesel Price : इंधन दरवाढ कायम, पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं, 13 दिवसांत 8 रुपयांची दरवाढ, पाहा आजचे दर
- Coronavirus Cases Today : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1096 रुग्ण, 81 जणांचा मृत्यू
- Adani : अदानींनी मुकेश अंबानी आणि झुकेरबर्गला मागे टाकलं, जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, जाणून घ्या किती आहे संपत्ती