West Bengal: गोळीबार...बॉम्ब फेक...बॅलेट बॉक्सची पळवापळवी; बंगालच्या पंचायत निवडणुकीत 26 ठार
Bengal Panchayat Election 2023: पश्चिम बंगालच्या पंचायत निवडणुकीत आज मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळून आला.
West Bengal Panchayat Election: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) आज पार पडत असलेल्या मतदानात हिंसाचाराच्या घटना घडल्या. ठिकठिकाणी झालेल्या हिंसाचारात 26 जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये तृणमूल काँग्रेस, भाजप आणि माकप-डाव्या आघाडीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. राज्यात झालेल्या हिंसाचारासाठी सत्ताधारी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप डाव्यांनी आणि भाजपने केला आहे. काही ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्यात, काही ठिकाणी बॅलेट बॉक्स पळवण्यात आले. काही ठिकाणी मतदारांना पळवले जात आहे.
पश्चिम बंगालमध्ये पंचायतींच्या 73,887 जागांसाठी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तैनातीची मागणी करण्यात येत होती. केंद्रीय पोलीस दल तैनात असतानादेखील हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी बॉम्बफेक, हिंसाचार, गोळीबाराच्या घटनांचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही ठिकाणी बॅलेट बॉक्सला आगी लावण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. बळजबरीने मतदान झाल्याचेही वृत्त आहे.
#BengalPanchayatElection | कई जगह बूथ कैप्चरिंग, कहीं बैलेट बॉक्स लूटा तो कहीं लगा दी आग @manogyaloiwal की ग्राउंड रिपोर्ट@vivekstake | @BafilaDeepa | https://t.co/smwhXUROiK#WestBengal #PanchayatElection #Election #BoothCapturing #WestBengalViolence pic.twitter.com/Pl6zZczY9N
— ABP News (@ABPNews) July 8, 2023
पंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरू होण्याआधीच सात जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मतदानाच्या वेळी हिंसाचार वाढला. दुपारपर्यंत एकूण 26 जण ठार झाल्याची माहिती समोर आली.
तृणमूलचा उलट सवाल, केंद्रीय सुरक्षा दल कुठे आहे?
सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने भाजप आणि विरोधकांवर निशाणा उलट प्रश्न केला आहे. आमच्या पक्षाचे तीन कार्यकर्ते रेजीनगर, तुफानगंज आणि खारग्राममध्ये ठार झाले आहेत आणि डोमकोलमध्ये दोन जण जखमी झाले आहेत. पश्चिम बंगाल भाजप, पश्चिम बंगाल सीपीआय(एम) आणि पश्चिम बंगाल काँग्रेस केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी करत आहेत. मग, केंद्रीय दलांची सर्वाधिक गरज असताना ते कुठे आहेत? असा प्रश्न तृणमूलने केला. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याचा आरोप पक्षाचे नेते कुणाल घोष यांनी केला.
मुर्शिदाबाद पोलीस स्टेशन अंतर्गत बरंडा येथील मतदान केंद्रावर सीपीएमचा पोलिंग एजंटांना मारहाण केल्याचा आरोप टीएमसीवर आहे. मुर्शिदाबाद पोलिसांनी एका मतदान केंद्रातून तीन पोलिंग एजंटांची सुटका केली.
पश्चिम बंगाल काँग्रेसचे अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस, पोलीस प्रशासन आणि निवडणूक आयोगाने बंगालमध्ये दहशतीचे राज्य स्थापन केले आहे. मृतांची संख्या 26 वर पोहोचली आहे आणि शेकडो लोक जखमी झाले आहेत. बंगालमधील राजकीय आणि निवडणुकीचे वातावरण हिंसाचाराने भरलेले आहे. ही लोकशाही आणि पंचायत निवडणुकांची फसवणूक आहे. हे निवडणूक गैरप्रकारांचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका त्यांनी केली. माकपचे पश्चिम बंगालचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनीदेखील निवडणुकीतील हिंसाचाराला तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे. सलीम यांनी काही व्हीडिओ ट्वीट करत मतपत्रिका प्रकारे बळकावल्या गेल्याचा आरोप केला.
पंचायत निवडणुकीच्या हिंसाचारात बंगाल पेटत असल्याची टीका विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली. ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या अभिषेक बंगाल लुटण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी केली.राज्य निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा हे टीएमसी कार्यकर्त्यांप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.