School Reopen News : पश्चिम बंगालमध्ये 16 फेब्रुवारीपासून शाळा उघडणार
WB School Reopening: मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे.
West Bengal School Reopen News : मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांच्या संख्या कमी होत आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालच्या शिक्षण खात्याने याची सोमवारी घोषणा केली. त्यानुसार, 16 फेब्रुवारीपासून राज्यातील शाळा उघडणार आहेत.
सोमवारी ममता बॅनर्जीच्या सरकारने कोरोना निर्बंधामध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या शाला 16 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु होणार आहेत. पण रात्री 12 ते पहाटे पाच वाजेपर्यंतची संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
पश्चिम बंगाल सरकारने (West Bengal Government) 16 फेब्रुवारीपासून प्राथमिक आणि उच्च माध्यमाकि शाळा पुन्हा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. याआधी पश्चिम बंगालमध्ये आठी ते 12 पर्यंतच्या शाळा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता बुधवारपासून प्राथमिक शाळा (Primary Schools) सुरु करण्याची घोषणा केली आहे.
रात्रीची संचारबंदी कायम -
पश्चिम बंगाल सरकारने रात्री 12 ते पहाटे पाच वाजेपर्यंतची संचारबंदी कायम ठेवली आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली आहे. पण काळजी म्हणून राज्यातील संचारबंदी कायम ठेवण्यात आली
West Bengal Govt permits reopening of all primary and upper primary schools from Feb 16
— ANI (@ANI) February 14, 2022
Night curfew to remain in force between 12 midnight and 5 am pic.twitter.com/q6VpoNq5q7
गेल्या 24 तासात देशात 34 हजार 113 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात 44 हजार 877 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यामानाने रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे.
आत्तपर्यंत देशात 4 कोटी 26 लाख 31 हजार 421 रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यातील 4 कोटी 16 लाख 77 हजार 641 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे आत्तापर्यंत 5 लाख 9 हजार 11 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 4 लाख 78 हजार 882 एवढी आहे. सध्या देशात कोरोना पॉझिटीव्हीटी रेट हा 3.19 टक्के आहे.