एक्स्प्लोर

पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन; वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

Budhadev Bhattacharya: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन झालंय. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Budhadev Bhattacharya: पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य (Budhadev Bhattacharya) यांचे निधन झालं आहे. कोलकाता येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 80 वर्षांचे होते. बंगालच्या माजी मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सकाळी 8.20 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते बरेच दिवस आजारी होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना जुलैमध्ये रुग्णालयातही दाखल करण्यात आले होते. ते दीर्घकाळापासून सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) आणि वृद्धापकाळाशी संबंधित इतर आजारांनी त्रस्त होते. त्याच्यावर कोलकाता येथील घरी उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे. 

भट्टाचार्य प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक जीवनापासून दूर होते. त्यांनी 2015 मध्ये सीपीआय(एम) च्या पॉलिटब्युरो आणि केंद्रीय समितीचा राजीनामा दिला आणि 2018 मध्ये राज्य सचिवालयाचे सदस्यत्व सोडलं.

बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या कोलकाता येथील घरी त्यांच्यावर उपचार सुरू होते. भट्टाचार्य यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगी आहे. माकपचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 2015 मध्ये भट्टाचार्य यांनी CPI(M) च्या पॉलिट ब्युरो तसेच त्यांच्या पक्षाच्या केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होता. जुलैमध्ये अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं त्यांच्या शारीरिक त्रासात वाढ झाली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथील वुडलँड हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या प्रकृतीची माहिती मिळताच वुडलँड्समधून माजी मुख्यमंत्र्यांच्या पाम अव्हेन्यू येथील घराकडे रुग्णवाहिका पाठवण्यात आली. वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिक्स रुग्णवाहिकेतून पाम अव्हेन्यू येथे आले आणि त्याला रुग्णालयात आणण्यात आलं. 

बुद्धदेव भट्टाचार्य कोण होते?                                        

भट्टाचार्य 2000 ते 2011 पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे सदस्यही होते. बुद्धदेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकाता येथे झाला. नंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. त्यांना डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनशी जोडले गेले. त्यांना सीपीआयच्या युवा शाखेचं राज्य सचिव बनवण्यात आलं, जी नंतर डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीन झाली होती.                                       

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन

मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...

Embed widget