एक्स्प्लोर

Asansol : बंगालमध्ये पोटनिवडणुकीदरम्यान भाजप नेत्याच्या ताफ्यावर दगडफेक, तृणमूल काँग्रेसवर आरोप

Asansol Bypolls : पश्चिम बंगालमध्ये आसनसोल मतदारसंघात अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांच्या विरोधात तृणमूलने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना उमेदवार म्हणून रिंगणात उभं केलं आहे.

Asansol Bypolls : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. आसनसोल मतदारसंघात भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशी लढत पाहायला मिळत आहे. दरम्यान भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात झाल्याचं समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसने आपल्या ताफ्यावर हल्ला केल्याचा गंभीर आरोप अग्निमित्रा पॉल यांनी केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमच्या हल्ला केला आणि ताफ्यावर दगडफेक केली. यावेळी त्यांनी पोलिसांवरही कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. अग्निमित्रा पॉल म्हणाल्या की, ममता बॅनर्जींनी कितीही प्रयत्न केले तरी विजय भाजपचाच होईल.

भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांच्या राजीनाम्यामुळे आसनसोल लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. आसनसोल मतदारसंघात अग्निमित्रा पॉल (Agnimitra Paul) यांच्या विरोधात तृणमूल काँग्रेसने अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांना उमेदवार म्हणून रिंगणात उभं केलं आहे. आसनसोलमध्ये मंगळवारी सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. येथे कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. आसनसोल मतदारसंघात 15 लाख मतदार आहेत. केंद्रीय दलाच्या 63 तुकड्या आसनसोलमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. संध्याकाळी 6.30 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे.'

आसनसोल मतदारसंघाचा इतिहास
आसनसोल लोकसभा 1957 ते 1967 पर्यंत काँग्रेसकडे होती. त्यानंतर 1967 ते 1971 दरम्यान आसनसोल मतदारसंघ संयुक्त समाजवादी पक्षाकडे होता. माकपने 1971 ते 1980 काळात हा मतदारसंघ काबिज केला. त्यानंतर काँग्रेसने पुन्हा सत्ता काबिज करत 1989 पर्यंत महत्त्वपूर्ण मतदारसंघ ताब्यात घेतला. 1989 ते 2014 पर्यंत ही जागा सीपीआय(एम) च्या ताब्यात होती. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बाबुल सुप्रियो यांनी भाजपच्या तिकीटावर पहिल्यांदा ही जागा जिंकली. बाबुल सुप्रियो 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर पुन्हा विजयी झाले, त्यानंतर ते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मंत्रीही झाले.

पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीनंतर बाबुल सुप्रियो यांनी भाजपला रामराम केला आणि तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पोटनिवडणूक आवश्यक असल्याने आसनसोल लोकसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. यावेळी, तृणमूल कांग्रेसचे आमदार सुब्रोतो मुखर्जी यांच्या आकस्मिक निधनामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये रिक्त झालेल्या बालीगंगे विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घ्यावी लागली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामनाCM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget