एक्स्प्लोर

Weekly Recap : नवं संसद भवन आणि समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन, UPSC आणि बारावीचा निकाल; या आठवड्यातील लक्षवेधी घडामोडी

Weekly Recap : या आठवड्यात 21 ते 28 मे दरम्यान राज्यात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पाहुयात या बातम्यांचा आढावा.

Headline This Week : सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा जाणून घ्या.

नवीन संसद भवनाचं उद्घाटन

देशाला 28 मे रोजी नवीन संसद भवन मिळालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन संसद भवनाचं उद्घाटन करण्यात आलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये पंतप्रधान मोदींना सेंगोल म्हणजेच राजदंड सुपूर्द करण्यात आला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदींनी राजदंडाला दंडवत घातला. यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली. जुन्या संसदेत लोकसभेत 543 खासदार बसू शकत होते, तर नव्या संसदेत 888 खासदार बसू शकतील अशी व्यवस्था आहे. तर राज्यसभेत सध्याची 250 ची क्षमता वाढवून 384 करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा (Samruddhi Mahamarg Second Phase) शिर्डी-भरवीर 26 मेपासून खुला करण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर आता सहा तासांत पूर्ण करता येणार आहे. 

कुस्तीपटूंचा नव्या संसदेला घेराव घालण्याचा प्रयत्न

दिल्लीमध्ये सुरु असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनात गोंधळ सुरु आहे. पोलिसांनी आता आंदोलक कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कुस्तीपटूंनी 28 मे रोजी नव्या संसद भवनाच्या उद्घाटना दिवशी भवनाला घेराव घालण्याच्या प्रयत्न केला. दिल्लीच्या जंतर-मंतर येथून नवीन संसदेसमोर महापंचायत भरवायला निघालेल्या पैलवानांना पोलिसांनी अडवलं. त्यानंतर पोलीस आणि आंदोलक पैलवानांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांनी पैलवानांना ताब्यात घेतलं. बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या पैलवानांनी आंदोलन पुकारलं आहे. 

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर

यूपीएससी 2022 (UPSC CSE 2022) परीक्षेचा निकाल 23 मे रोजी जाहिर करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज जाहीर केलेल्या निकालात इशिता किशोर या विद्यार्थीनीने अव्वल स्थान पटकावले. पहिल्या तीन क्रमांकावर मुलींनी बाजी मारली. महाराष्ट्रात करिश्मा संखे पहिली आली.

बारावीचा निकाल जाहीर

Maharashtra HSC Class 12 Results : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (HSC Board) इयत्ता बारावीचा निकाल (HSC Result 2023) जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 91.25 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. 96.01 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 88.13 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे.

अरविंद केजरीवालांनी घेतली उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल यांनी महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. केंद्र सरकारने दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात अध्यादेश आणला असून त्याविरोधात अरविंद केजरीवाल यांनी आता विरोधकांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 24 मे रोजी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तर, 25 मे रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग

पुण्याच्या टिंबर मार्केट गोडाऊनला मोठी आग लागली होती. या आगीत नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेकांचे संसार उद्धस्त झाले आहेत तर जवळच्या शाळेतील बाक आणि मुख्यध्यापकांच्या खोलीतील सामान जळून खाक झाले आहे. 25 मे रोजी पहाटे साधारण चारच्या सुमारास ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांची आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल पाच तास लागले.

'एक राज्य एक गणवेश योजना' लागू होणार

राज्य सरकार याच शैक्षणिक वर्षापासून ( New Academic year) 'एक राज्य एक गणवेश' या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. यावर्षीपासून राज्यातील प्रत्येक सरकारी शाळेतील विद्यार्थी एकाच गणवेशात दिसतील. सर्व सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश लागू असेल.  मात्र काही शाळांनी या निर्णयापूर्वीच कपड्यांच्या ऑर्डर दिल्याने विद्यार्थी तीन दिवस सरकारी योजनेचा  आणि तीन दिवस शाळेने निर्धारित केलेला गणवेश वापरतील अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. 

पाठ्यपुस्तकालाच जोडली वह्यांची पानं, बालभारतीची नवी वही 

विद्यार्थ्यांच्या पाठीपरील दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी शैक्षणिक विभागाकडून नवीन योजना लागू करण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक वर्षासाठी पाठ्यपुस्तकालाच वह्यांची पानं जोडली आहेत. 

सुवर्णवेधी नीरज चोप्रा जागतिक क्रमवारीत अव्वल

Neeraj Chopra Ranking : भारताचा सुवर्णवीर नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आता भालाफेकच्या (Javelin Throw) क्रमवारीत नंबर 1 खेळाडू बनला आहे. सोमवारी (22 मे) त्याने ही कामगिरी केली. दरम्यान, जागतिक अॅथलेटिक्सनं नवी क्रमवारी जाहीर केली आहे, ज्यामध्ये नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेक रँकिंगमध्ये नंबर-1 बनला आहे. या भारतीय स्टारनं पहिल्यांदाच हे मानांकन मिळवून इतिहास रचला आहे. 

आयपीएल 2023 चा अंतिम सामना

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier league) यंदाच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना आज, 28 मे रोजी खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) गुजरात टायटन्स (GT) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. आजच्या सामन्यानंतर यंदाच्या मोसमातील विजेता मिळणार आहे. यंदाच्या मोसमात हे दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमने-सामने येणार आहे. विशेष म्हणजे यंदाच्या मोसमाची सुरुवातही या चेन्नई आणि गुजरात यांच्या लढतीने झाली होती आणि आता शेवटही याच दोघांच्या सामन्याने होणार आहे.

अभिनेता आदित्य सिंह राजपूतचा मृत्यू

Aditya Singh Rajput Demise : प्रसिद्ध अभिनेता आणि मॉडेल आदित्य सिंह राजपूतचा (Aditya Singh Rajput)  मृत्यू झाला आहे. आदित्य सिंह राजपूत याचा मृतदेह सोमवारी (22 मे) दुपारी त्याच्या अंधेरी (Andheri) येथील घरातील बाथरूममध्ये आढळला. आदित्यच्या एका  मित्राला आदित्य हा मृतावस्थेत आढळला, त्यानंतर त्या मित्राने आणि इमारतीच्या वॉचमॅनने आदित्यला रुग्णालयात नेले. रुग्णालयात आदित्यला मृत घोषित करण्यात आले. आदित्यच्या मृत्यूमागील कारण अजून स्पष्ट झालेलं नाही.

अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं कार अपघातात निधन

Vaibhavi Upadhyay Passes Away : 'साराभाई वर्सेस साराभाई' (Sarabhai vs Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायचं (Vaibhavi Upadhyay) निधन झालं आहे. कार अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे. वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीने अखेरचा श्वास घेतला आहे. हिमाचल प्रदेशामध्ये कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला आहे. आता चंडिगडहून कुटुंबीय तिचं पार्थिव मुंबईत आणत आहेत. तिच्या पार्थिवावर आज (24 मे 2023) सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

'अनुपमा' फेम अभिनेता नितेश पांडेचं निधन

Nitesh Pandey Death : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 51 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget