एक्स्प्लोर

Weather Update : घटस्थापनेच्या मुहूर्तावर पावसाची हजेरी, महाराष्ट्रासह देशाच्या या भागांत पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अपडेट जारी

IMD Forecast, Monsoon Update : आज 15 ऑक्टोबर रोजी राज्यासह देशात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहेत.

Weather Update Today : आज शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2023) सुरुवात होत असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यासह देशभरात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. आज आणि उद्या महाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील 48 महाराष्ट्रात काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यात हवामान खात्याने वर्तवली आहे. दिल्लीसह उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. देशासह राज्यातील अनेक भागातून मान्सूनने माघारी घेतली असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मात्र, पावसामुळे देशभरातील काही भागांना दिलासा मिळणार आहे. 

कुठे ऊन, कुठे पाऊस

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असताना देशाच्या अनेक भागात अजूनही पाऊस बरसताना पाहायला मिळत आहे. यासोबतच काही भागांत तापमन वाढीमुळे अनेक ठिकाणी उन्हाची झळ जाणवत आहे. सध्या दिल्लीत हवामान बदलताना दिसत आहे. सकाळी गुलाबी थंडी जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत दिल्लीत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. यामुळे तापमानात घट होण्याचाही अंदाज आहे.

देशाच्या 'या' भागांत पावसाची शक्यता

उत्तर प्रदेशमध्येही थंडीची चाहून लागल्याचं चित्र दिसून येत आहे. गुजरात, राजस्थानसह उत्तर प्रदेशातून मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशात 15 ते 17 ऑक्टोबर दरम्यान, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशासह, उत्तराखंडमध्येही पहाटे गुलाबी थंडी पडताना दिसत आहे. आज आणि उद्या हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मंढी आणि शिमला भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात घटस्थापनेच्या मुहूर्तावर पाऊस

महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाचा अंदाज

राज्यातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असली, तरी पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टी निर्माण झाल्याने देशासह राज्यात काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यात पुढील 48 तासांत कोकणसह काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी कोकण किनारपट्टी भागांत काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तर, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता झाली आहे. याशिवाय पुढील 48 तासांत उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद
Maharashtra Live News Updates: राहुल गांधी यांचा आज महाराष्ट्र दौरा; पुण्यात साधणार विद्यार्थ्यांशी संवाद

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NHAI Toll Pass: 'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
'या' लोकांचा आता टोल कट होणार नाही; NHAI ने आणला विशेष पास, कसा मिळवता येईल?
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
रोहित पवारांना एवढंच काम शिल्लक; पुण्यातील कार्यक्रमावरुन विखे पाटलांची राहुल गांधींवरही बोचरी टीका
Chhatrapati Sambhaji Nagar Boy Jumps Down From Mountain: मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
मुलाने iPhone साठी जीवन संपवल्याची चर्चा; आता प्रत्यक्षदर्शीने वेगळचं सांगितलं, डोंगरावर काय घडलं?
Udgir Crime News : तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तीन दिवसाच्या तपासानंतर प्रकार उघड
उदगीरमध्ये तब्बल 2 हजार 134 कोटींचा महाघोटाळा; 16 कंपन्यांशी संगनमत करून निधी थेट परदेशात पाठवला, आयकर विभागाच्या तपासानंतर प्रकार उघड
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
आयफोन हे कारण नाही, ती केवळ चर्चा; पोलिसांच्या तपासातून वेगळीच माहिती, DCP नवलेंकडून स्पष्टीकरण
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले
Jaggery Price Hike : साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
साखरेनंतर आता गुळानेही खाल्ला भाव; एक गुळासाठी मोजावे लागणार 'इतके' रुपये, सामान्य नागरिकांच्या खिशावर भार
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
इथेनाॅलमुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या किंमती दणादण वाढल्या? आता केंद्र सरकारने केला खुलासा
Embed widget