एक्स्प्लोर

तेजस्वी यादवांना बरखास्त करा, आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ: भाजप

पाटणा: बिहारमधील राजकारण सध्या एका वेगळ्याच वळणावर येऊन उभं ठाकलं आहे. त्यामुळे पुढच्या क्षणी काय होईल याचा अंदाज कुणालाच लावता येत नाही. याच दरम्यान, बिहार भाजपचे अध्यक्ष नित्यानंद राय यांनी राजकीय खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं आहे. 'भाजप नितीश कुमार यांना बाहेरुन पाठिंबा देऊ शकतं.' असं नित्यानंद राय म्हणाले. याचाच अर्थ नितीश कुमार यांनी यापुढे लालूप्रसाद यांच्या पाठिंब्याचा विचार करु नये असं भाजपला वाटतं. नीतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना बरखास्त करावं. त्यामुळे सरकार जर अडचणीत आलं तर भाजप नितीश कुमार यांना पाठिंबा देईल. नित्यानंद राय म्हणाले की, 'जर एखाद्या व्यक्तीनं अघोषित संपत्ती जमा केली असेल तर अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवलं जाऊ नये. जर तुम्हाला पाठिंब्याची गरज पडली तर आम्ही बाहेरुन पाठिंबा देऊ. पण आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार नाही.' लालू आणि त्यांच्या नातेवाईकांवर सीबीआयनं एफआयआर दाखल केल्यानंतर राष्ट्रीय जनता दल अर्थात आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे कोणत्याही परिस्थितीत आपल्या पदाचा राजीनामा देणार नसल्याचे पक्षानं स्पष्ट केलं आहे. सीबीआयनं लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्यासह सात लोकांवर रेल्वेच्या हॉटेलचे कंत्राट देताना भ्रष्टाचारप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. कसं आहे बिहारचं सत्ता समीकरण: बिहारमध्ये विधानसभेच्या 243 जागा आहेत. त्यामुळे इथं मॅजिक फिगर 122 आहे. बिहारमध्ये जेडीयू, आरजेडी आणि काँग्रेसची आघाडी आहे. या आघाडीत जेडीयू 71, आरजेडी 80 आणि काँग्रेसकडे 27 जागा आहे. म्हणजे एकूण 178  जागा आहेत. तर भाजपच्या 53 जागा आहेत. अशावेळी जर आरजेडीनं पाठिंबा काढून घेतला तर जेडीयूच्या 71 जागा, भाजपच्या 53 आरएलएसपी आणि एलजेपी 2-2 आणि हम या पक्षाची 1 जागा (एकूण 129 जागा) मिळून नितीश कुमार सत्ता स्थापन करु शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

CJI Suryakant on Delhi Police Lathicharge: आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब चुकता करावा लागणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून महत्त्वाचा आदेश
PM Modi Video Ban Facebook: फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
फेसबुकने अचानक पंतप्रधान मोदींचा तो व्हिडीओ हटवला, गदारोळ होताच निर्णय फिरवला, नेमकं काय घडलं?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
ग्रामस्थांच्या मरणयातना सुरूच, गावात स्मशानभूमी नसल्याने चक्क ग्रामपंचायती समोरच मृतदेहावर अंत्यसंस्कार
Maharashtra Goverment Cabinet Decision: पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
पुणे, अहिल्यानगरपासून सोलापूर परभणी, नांदेडपर्यंत...; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 धडाकेबाज निर्णय
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
Shetkari Karjmafi: कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
कर्जमाफीच्या यादीमध्ये गोंधळ; यादीतील रक्कम, केवायसीवरील रक्कम अन् कर्जांच्या रकमेतही तफावत, शेतकऱ्यांचा संताप, नेमकी अडचण काय?
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
'गटार छाप, आई-बापाच्या जीवावर ऐश, ड्रग्ज, दारू घेणाऱ्या, कित्येकांसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या...'; हिंदू तरुणींबाबत कंगना नको नको ते बरळली
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Embed widget