एक्स्प्लोर

Waqf Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक आज लोकसभेत मांडणार; नितीशकुमारांचं ठरलं, पण चंद्राबाबूंची टीडीपीने, ठाकरेंच्या शिवसेनेनं कोणता निर्णय घेतला? काँग्रेससह अनेक पक्षांकडून खासदारांना व्हिप जारी

Waqf Bill : तामिळनाडूचा AIADMK, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि के चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती यासारखे तटस्थ पक्षही या प्रकरणात विरोधी पक्षांसोबत आहेत.

Waqf Amendment Bill : वक्फ दुरुस्ती विधेयक आज (2 एप्रिल) लोकसभेत मांडलं जाणार आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी 12 वाजता विधेयक सभागृहात मांडले जाईल. यावर चर्चा करण्यासाठी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी 8 तासांची मुदत दिली आहे. यापैकी एनडीएला 4 तास 40 मिनिटे, तर विरोधकांना उर्वरित वेळ मिळाला आहे.चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पार्टी (टीडीपी) आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड (जेडीयू) यांनी विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. दोन्ही पक्षांनी आपल्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हिप जारी केला आहे.

इंडिया आघाडीची संसद भवनात बैठक 

दुसरीकडे विरोधक या विधेयकाला विरोध करत आहेत. तामिळनाडूचा AIADMK, नवीन पटनायक यांचा बिजू जनता दल आणि के चंद्रशेखर राव यांची भारत राष्ट्र समिती यासारखे तटस्थ पक्षही या प्रकरणात विरोधी पक्षांसोबत आहेत. काल, इंडिया आघाडीची संसद भवनात बैठक झाली आणि त्यांनी या विधेयकावर त्यांच्या रणनीतीवर चर्चा केली. याशिवाय विरोधकांनी चर्चेची वेळ वाढवून 12 तास करण्याची मागणी केली आहे. यावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, चर्चेचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. कोणत्या पक्षाची भूमिका काय आहे, हेही देशाला जाणून घ्यायचे आहे.

सरकारने जेडीयू-टीडीपीच्या सूचना स्वीकारल्या

  • विधेयकावर दोन्ही पक्षांनी 3 सूचना दिल्या होत्या. सरकारने हे मान्य केले आहे.
  • कायदा पूर्वलक्षी पद्धतीने लागू करू नये.
  • जुनी मशीद, दर्गा किंवा इतर मुस्लिम धार्मिक स्थळांशी छेडछाड केली जाणार नाही.
  • जमीन हा राज्याचा विषय आहे. राज्यांचेही स्पष्ट मत जमिनीवर घेतले पाहिजे.

कॅबिनेटने फेब्रुवारीमध्ये या विधेयकाला मंजुरी दिली

मंत्रिमंडळाने 19 फेब्रुवारी रोजी वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली होती. विधेयकावर स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) अहवालाच्या आधारे वक्फ विधेयकाचा नवा मसुदा तयार करण्यात आला आहे. या विधेयकावरील जेपीसी अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात 13 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर करण्यात आला. समितीने 30 जानेवारी रोजी सभापती ओम बिर्ला यांना 655 पानांचा अहवाल सादर केला होता. यावेळी जेपीसी अध्यक्ष जगदंबिका पाल, निशिकांत दुबे आणि इतर भाजप खासदार उपस्थित होते. मात्र, विरोधी पक्षाचा एकही खासदार दिसत नव्हता.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी विरोध केला

समितीत समाविष्ट असलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी अहवालावर आक्षेप घेतला होता. 16 सदस्यांनी अहवालाच्या बाजूने, तर 11 सदस्यांनी विरोधात मतदान केले. उर्वरित सदस्यांनी मतदानात भाग घेतला नाही. AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले होते की, 655 पानांचा अहवाल एका रात्रीत वाचणे अशक्य होते. मी अहवालाशी असहमती व्यक्त केली आहे. त्याच वेळी, जेपीसी सदस्य द्रमुक खासदार ए राजा म्हणाले होते की भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी त्यांच्या इच्छेनुसार समितीची कार्यवाही केली. मला वाटतं अहवालही आधीच तयार केला होता. हे विधेयक मंजूर झाल्यास आम्ही त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाऊ.

विधेयकाच्या निषेधार्थ काळ्या पट्टी बांधून ईदची नमाज

वक्फ विधेयकाच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मुस्लिमांनी काळ्या पट्ट्या बांधून ईदची नमाज अदा केली. 28 मार्च रोजी, रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी (जुमातुल विदा), ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ने देशभरातील मुस्लिमांना काळ्या पट्ट्या घालून नमाज अदा करण्यास सांगितले होते.

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात

दरम्यान, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर शिवसेना ठाकरे गटाची भूमिका गुलदस्त्यात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका चर्चेवेळी उघड होण्याची शक्यता आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावर ठाकरेंची शिवसेना इंडिया आघाडीसोबत विरोधात राहणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. सरकारमधील भाजपसोबतचे घटक पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे ठाकरेंच्या शिवसेनेचं लक्ष आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकातील काही मुद्द्यांवर जेपीसीमध्ये बोट ठेवत ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूचना नोंदवण्यात आल्या आहेत. आता याचा विचार या बिल मांडताना झाला आहे का? हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाहिलं जाईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्व लोकसभा खासदारांनी आज लोकसभेत हजर राहून चर्चेत सहभागी व्हावे, अशा प्रकारचा व्हीप पक्षाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? 2026 पर्यंत लोकसंख्येत किती वाढ? 
स्वातंत्र्यावेळी भारताची लोकसंख्या किती होती? देशाच्या लोकसंख्येत 2026 पर्यंत किती वाढ?
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Rahul Gandhi : मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?
मेलोनींवर कमेंट, राहुल गांधींवर फौजदारी गुन्हा दाखल होणार? परदेशी पंतप्रधान खटला भरू शकतो का? काय आहे नियम?

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Embed widget