एक्स्प्लोर

व्ही. के. सिंग यांनी मुद्दाम बढती रोखली : लष्करप्रमुख दलबीर सिंग

नवी दिल्ली : व्ही. के. सिंग यांनी सूडबुद्धीने माझी बढती रोखली, असा आरोप भारताचे लष्करप्रमुख दलबीर सिंग यांनी केला आहे. माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांच्यावरील गंभीर आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे.   तथ्यहीन, खोटी आणि काल्पनिक कारणं देत सिंग यांनी आपलं प्रमोशन थांबवून ठेवल्याचा दावा दलबीर सिंग यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. दलबिर सिंग यांनी बुधवारी सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबद्दलचा उल्लेख केला आहे.   2012 मध्ये तत्कालीन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी माझा छळ करण्याचा प्रयत्न केला होता. लष्कप्रमुखपदी होणारी माझी बढती रोखणं, हेच तेव्हा व्ही. के. सिंग यांचं उद्दिष्ट असल्याचा आरोप दलबीर सिंग यांनी केला आहे.   19 मे 2012 रोजी मला पाठवलेल्या नोटीशीमध्ये तथ्यहीन, खोटे आणि कपोकल्पित आरोप करण्यात आले होते. त्यावेळी माझ्यावर अवैधपणे शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याचंही दलबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.   आसामच्या जोरहाटमध्ये डिसेंबर 2011 मध्ये झालेल्या लष्करी कारवाईची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. ही परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत व्ही. के. सिंग यांनी एप्रिल 2012 ते मे 2012 या कालावधीत दलबीर सिंग यांच्यावर निर्बंध आणले होते.   मात्र हा प्रकार घडला तेव्हा आपण जनरल ऑफिसर पदी होतो, त्याचप्रमाणे आपल्याकडे दिमापूरच्या लष्करी तळावरच्या तीन कॉर्प्सची जबाबदारी होती. जोरहाटमध्ये लष्करी कारवाई झाली त्यावेळी मी सुट्टीवर होतो आणि मी 26 डिसेंबरला परतलो, असं दलबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे.   दलबीर सिंग यांची लष्कप्रमुखपदी नियुक्ती करताना पक्षपात झाल्याच्या आरोपातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. त्याला उत्तर देताना दलबीर यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
Embed widget