एक्स्प्लोर
विराट, सचिन, सनी लिओनीचे होळीनिमित्त देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली : आज संपूर्ण देश रंगाचा उत्सव होळीच्या रंगात न्हाऊन निघत आहे. होळीच्या सणाचा देशातील प्रत्येकजण आनंद घेत असताना, सिने जगतातील अनेक सेलिब्रिटींपासून ते क्रीकेटपटूंनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र, यामध्ये काही सेलिब्रेटिंनी होळीच्या शुभेच्छांसह देशवासियांना आवाहनही केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने होळीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा देताना, प्रण्यांना इजा पोहचवू नये, असं आवाहन केलं. सनीने आपल्या ट्विटमध्ये भटक्या कुत्र्याचा फोटो शेअर करुन, ''सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, सुरक्षित राहा आणि प्राण्यांना इजा पोहचवू नका,'' असं म्हणलं आहे.Happy holi everyone!!! Be safe and don't hurt the animals!! pic.twitter.com/RXjYIJTZPG
— Sunny Leone (@SunnyLeone) March 13, 2017
Happy Holi everybody. Have a great day today ????????????. Please make sure no harm is done to the animals on the streets. God Bless all. pic.twitter.com/3a3NbUib0a — Virat Kohli (@imVkohli) March 13, 2017दुसरीकडं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करुन देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराटने या व्हिडिओमध्ये, ''सर्व देशवासियांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा, कृपया रस्त्यांवरील प्राण्यांना इजा पोहचवू नये,'' असं म्हणलं आहे.
याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनंही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने होळीच्या शुभेच्छा देताना, पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे.May this #Holi add more colours to your life. Have a happy & safe Holi! Also, a small request to save water :) pic.twitter.com/aXUVQaDQ7l
— sachin tendulkar (@sachin_rt) March 13, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
शिक्षण
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement