एक्स्प्लोर
कुत्र्याच्या तीन पिल्लांना जिवंत जाळलं, व्हिडिओ व्हायरल
हैदराबाद : काही अल्पवयीन तरुणांनी कुत्र्याच्या तीन पिल्लांना जिवंत जाळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हैदाराबादेतील मुशीराबादमधल्या एका स्मशानात ही घटना घडल्याची माहिती आहे.
मुशीराबाद फिश मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका अल्पवयीन तरुणाने या घटनेचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर अपलोड केला, त्यानंतर तो व्हायरल झाला आहे. पशुप्रेमींनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिस स्थानकात धाव घेतली आहे. कलम 429 (प्राण्यांना दुखापत करणे किंवा हत्या) अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेन्नईत मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी एका कुत्रीला इमारतीच्या गच्चीवरुन खाली फेकल्याचा व्हिडिओ ताजा असतानाच अशाच प्रकारच्या आणखी एका घटनेमुळे संताप व्यक्त केला जात आहे. आठपैकी सात अल्पवयीन तरुणांची ओळख पटली आहे. दयाकर कमान स्मशानाच्या परिसरात राहणारे हे तरुण असून तिथे सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळायला येतात.
14 जुलै रोजी आरोपींनी दोन-तीन महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्लांना पकडलं. त्यानंतर लांब काठ्यांशी पिल्लांना दोरीने बांधून ठेवलं. त्यावर झाडाच्या फांद्या आणि काटक्या टाकून पेटवलं. पिल्लांनी बाहेर येण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर त्यांना पुन्हा आत ढकललं. आगीत होरपळून तिन्ही पिल्लांचा मृत्यू ओढावला.
आरोपी अल्पवयीन तरुण वेगवेगळ्या इयत्तांमध्ये शिकत आहेत. त्यांच्यापैकी एक जण गॅरेजमध्ये तर एक जण फिश मार्केटमध्ये कामही करतो. पोलिसांनी आरोपींवर कडक कारवाईचं आश्वासन दिलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement