एक्स्प्लोर
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर
नवी दिल्ली: राष्ट्रपतिपदासाठी एनडीए आणि युपीएमध्ये रस्सीखेच सुरु असताना उपराष्ट्रपतिपदासाठीही निवडणुकीची घोषणा झाली. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज (गुरुवार) उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक 5 ऑगस्टला होणार असल्याचं जाहीर केलं. तसेच मतमोजणीही त्याच दिवशी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी आज या निवडणुकीची घोषणा केली.
या निवडणुकीची अधिसूचना ही 4 जुलैला जारी करण्यात येणार असल्याची माहिती झैदी यांनी दिली. दरम्यान, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 18 जुलै असणार आहे.
कसा असणार निवडणुकीचा कार्यक्रम:
- 4 जुलैला उपराष्ट्रपती निवडणुकीची अधिसूचना जारी होईल.
- 18 जुलैला निवडणूक अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
- 21 जुलैपर्यंत अर्ज मागे घेता येणार
- 5 ऑगस्टला मतदान
- 5 ऑगस्टलाच मतमोजणी
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला संपणार आहे. दरम्यान, आता उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएकडून तीन नावांची चर्चा आहे. यामध्ये सर्वात आधी नावं केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचं आहे. तर त्यानंतर आनंदीबेन पटेल आणि हुकूमदेव नारायण यांच्या नावाची चर्चा आहे.
मात्र, असं असलं तरीही पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नेमकं कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement