Uttarakhand elections 2022 : उत्तराखंड विधानसभा निवडणुक सध्या खूप चर्चेत आहे. लॅन्सडाऊन विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दिलीप सिंह रावत (Dilip Rawat Singh) यांचा तिसऱ्यांदा विजय झाला आहे, रावत यांच्या विरूद्ध भाजपचे बंडखोर आमदार हरकसिंग रावत यांच्या सून आणि काँग्रेसच्या उमेदवार अनुकृती गुसैन (Anukriti gusain) यांनी देखील आपली पूर्ण ताकद लावली होती. भाजपमधून काँग्रेसमध्ये (Congress) दाखल झालेल्या हरकसिंग रावत यांची सून अनुकृती गुनसाई या जागेवरून निवडणूक लढवत होत्या. अनुकृतीला राजकारणात आणण्यासाठी सासरेबुवांचा हाय-व्होल्टेज राजकीय गोंधळही दिसला. पण आता त्याचा काही उपयोग झाला नाही असे दिसते. अखेर अनुकृती गुनसैन यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, अनुकृती भाजपचे दिलीप सिंह रावत यांच्यापेक्षा जवळपास 9 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांची सून अनुकृती गुसैन मैदानात असल्याने सर्वांचे लक्ष या जागेवर लागले आहे. अनुक्रितीच्या तिकीट प्रकरणात हरकसिंग रावत यांना भाजप सोडावा लागला होता.


मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनलची जादू चालली नाही  
माजी कॅबिनेट मंत्री हरक सिंह रावत यांची सून अनुकृती गुनसाई ही मिस इंडिया ग्रँड इंटरनॅशनल आहे. अनुकृती उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरली होती. त्यानंतर अनुकृतीने हरक सिंह रावत यांच्यासोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, अनुकृती गुनसाई यांचा जन्म 25 मार्च 1994 रोजी गढवाल, उत्तराखंड येथे झाला. त्याने सुरुवातीला आर्मी पब्लिक स्कूल लॅन्सडाउनमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी डेहराडून इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून बीटेक केले. 2018 मध्ये अनुकृतीने हरक सिंह यांचा मुलगा तुषित रावतसोबत लग्न केले. यानंतर अनुकृती यांनी हरक सिंह रावत यांच्या लॅन्सडाउन सीटवरून अनेकदा प्रचार केला आहे.


निवडणुकीच्या काही दिवस अगोदर अनुकृती हरक यांच्यासोबत काँग्रेसमध्ये सामील झाल्या होत्या,
स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अनुकृतीला तिकीट देण्याच्या विरोधात राजधानीतील कोटद्वार ते काँग्रेस प्रदेश कार्यालयापर्यंत आंदोलन केले होते. स्थानिक नेत्यालाच तिकीट देण्याची त्यांची मागणी होती.  निवडणुकीच्या काही दिवस आधी अनुकृती यांनी हरक यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.


संबंधित बातम्या :