Uttar Pradesh Assembly Election 2022 Result : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस (Congress) पक्षाकडून (UP Assembly Election) 'बिकिनी गर्ल' अर्चना गौतम राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उतरल्या होत्या. मात्र त्यांचा इथं काही निभाव लागताना दिसून आलं नाही. आतापर्यंतच्या कलामध्ये अर्चना गौतम (Archana Gautam) यांना चौथ्या नंबरची मत मिळाली आहेत. मेरठमधील हस्तिनापूर विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे दिनेश खटीक यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 


अर्चना गौतमनं अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्या श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसल्या होत्या. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता. त्यांनी टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.  


अर्चना गौतम ही 2014 मध्ये मिस उत्तर प्रदेश बनली होती. त्यानंतर ती मिस बिकिनी इंडिया आणि मिस बिकिनी युनिव्हर्स इंडिया बनल्या होत्या. त्यांनी मिस कॉसमॉस वर्ल्ड 2018 मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. अर्चना गौतम अभिनेत्री, मॉडेल आणि ब्युटी पेजेंट विजेत्या आहेत. 


अचर्ना गौतम यांनी मेरठमधील आयआयएमटीमधून बीजेएमसी विषयात पदवी घेतली होती. अर्चना गौतम यांनी 2015 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. दक्षिणेतील चित्रपटसृष्टीत त्यांची ओळख बिकिनी गर्ल म्हणून ओळख आहे. आता ती IPL...it’s Pure Love या तेलुगू आणि गुंडाज आणि 47A या तामिळ चित्रपटांमध्ये काम करत आहे. अनेक जाहिरातींमधून देखील त्या दिसून आली आहे. 


आता अर्चना राजकीय आखाड्यात उतरल्या असून प्रियांका गांधी यांनी नुकत्याच घोषित केलेल्या काँग्रेसच्या पहिल्या यादीत तिचं नाव आहे. बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर राजकीय मैदानात अर्चना कशी बाजी मारते याकडे लक्ष लागून होतं.


सोशल मीडियावर देखील अर्चना यांचे मिलियन्समध्ये फॉलोअर्स आहेत. तिथं त्या सातत्यानं आपले फोटो शेअर करत असतात. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निमित्तानं अर्चना गौतम यांनी राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्या अपयशी ठरल्या. 


संबंधित बातम्या


Share Market : पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकाला दिवशी सेन्सेक्स 1000ने वधारला, निफ्टी देखील 321 अंकांनी वर


Goa Election Result : गोव्यात चुरस वाढली! सुरुवातीचे सर्व कल हाती; काँग्रेस-भाजपमध्ये घासून सामना, उत्पल पर्रीकर पिछाडीवर


Election Result 2022 : सुरुवातीच्या कलांमध्ये यूपी, उत्तराखंडमध्ये भाजप, पंजाबमध्ये आप आघाडीवर तर गोव्यात घासून!