एक्स्प्लोर

Uttarakhand : उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू होणार? बैठकांचे सत्र सुरू

Uniform Civil Code : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या संदर्भात आज एक बैठक घेतली असून हा कायदा लागू करण्याला गती देण्याचा प्रयत्न केला.

देहराडून: देशात समान नागरी कायदा मोदी सरकार कधी लागू असा प्रश्न विचारला जात असताना उत्तराखंडमध्ये हा कायदा लागू करण्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. उत्तराखंड सरकारने या संबंधी आज एक बैठक घेतली असून त्यामध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आल्याचं या संबंधित समितीच्या अध्यक्षा रंजना देसाई यांनी माहिती दिली. या संबंधित दुसरी बैठक ही दिल्लीमध्ये 14 किंवा 15 तारखेला होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात यावा अशी मागणी सत्ताधारी भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर अभ्यास करण्यासाठी रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती योग्य तो अभ्यास करुन लवकरात लवकर अहवाल देईल असा विश्वास मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला आहे. 

उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा दुसऱ्यांदा सांभाळणाऱ्या पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. उत्तराखंडच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. 

देशामध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा मुद्दा हा 1989 पासून भाजपच्या अजेंड्यावर आहे. 1989 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपण सत्तेत आल्यास देशात समान नागरी कायदा लागू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्येही भाजपने समान नागरी कायदा लागू करणार असल्याचं आश्वासन दिलं होतं. 

समान नागरी कायद्याचा मुद्दा पुन्हा एकदा तापण्याची चिन्हं आहेत. भाजपसह इतर काही राजकीय पक्षांनी समान नागरी कायद्यावर जोर देण्यास सुरुवात केली आहे. समान नागरी कायदा लागू करण्याच्यादृष्टीने सरकार पावलं टाकत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी समान नागरी कायद्याबाबत या आधी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं.  22 वा कायदा आयोग (LAW Commission) या मुद्यावर विचार करून सरकारला अहवाल सोपवणार असल्याची माहिती रिजिजू यांनी दिली.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक डिसेंबर रोजी लोकसभेत समान नागरीक कायदा लागू करण्याची मागणी केली होती. निशिकांत दुबे यांच्या या मागणीवर उत्तर देताना कायदा मंत्री किरण रिजिजू यांनी त्यांना एक पत्र लिहिले. किरण रिजिजू यांनी 31 जानेवारी रोजी लिहिलेल्या पत्रात हा मुद्दा गंभीर आणि संवेदनशील असल्याचे म्हटले. याबाबत कायदा आयोग विचार करणार असल्याचे म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
बनावट नोटांची छपाई करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, इन्स्टाग्राम रील्स पाहून बनवल्या नोटा, बंडलच्या वर खऱ्या तर खाली खोट्या नोटा
Abhijeet Dipke : राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
राहुल गांधींना ताब्यात घेताच अभिजीत दिपकेंची प्रतिक्रिया; म्हणाले, आता विरोधी पक्षनेत्यालाही...
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
देशातील सर्वात स्वच्छ शहर संकटात, रस्त्यांवर लागले कचऱ्याचे ढीग, नेमकं काय आहे कारण? 
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं
हिशोब चुकता केला जाणार! एकाही देशद्रोह्याला सोडले जाणार नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया समोर, दोन तासानंतर पोलिसांनी सोडलं

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Embed widget