UP Government : उत्तर प्रदेश सरकारने नुकताच स्त्रियांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार कोणत्याही नोकरदार महिलेला तिच्या लेखी परवानगीशिवाय सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि संध्याकाळी 7 नंतर रात्रीची शिफ्ट करण्याची सक्ती करता येणार नाही. जर महिला कर्मचारी रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत असेल तर तिच्या सुरक्षेची आणि जेवणाची जबाबदारी कंपनीची असेल. याचे उल्लंघन केल्यास कंपनीवर दंड आकारला जाईल. हे कामगार कायद्याचे उल्लंघन मानले जाईल.
खाजगी क्षेत्रातील महिलांना होईल फायदा
महिलांसाठी एनजीओ चालवणाऱ्या नीलिमा त्यागी म्हणतात की, हा निर्णय खूप चांगला आहे. यामुळे सध्या खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना फायदा होणार आहे. या क्षेत्रांमध्ये महिलांना नाईट शिफ्टची सुविधा दिली जात नसून, शासनाच्या या निर्णयानंतर महिलांना घर सोडण्याची जबाबदारी संस्थेवर देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत नाईट क्लब किंवा बार, रेस्टॉरंट इत्यादींमध्ये काम करणाऱ्या महिला सुरक्षित राहतील.
महिलांच्या सुरक्षेसाठी चांगला निर्णय
नोएडामधील एका खाजगी संस्थेत काम करणाऱ्या ज्योती सिंह यांच्या मते हा निर्णय चांगला आहे. यामुळे महिला सुरक्षित राहतील. त्यांना रात्री काम करण्याची सक्ती केली जाणार नाही. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारने संस्थांवर सोपवली आहे, अशा स्थितीत सरकारच्या महिला सुरक्षेवर प्रश्न निर्माण होत असल्याचे ज्योती सांगतात, कारण या निर्णयाचा महिलांवरही परिणाम होऊ शकतो, कंपन्या आता महिलांना नोकऱ्या देणे टाळू शकतात.
नवा नियम काय म्हणतो?
सरकारने महिलांच्या सुरक्षेचा विचार करून हा नियम लागू केला आहे. या आदेशाची अंमलबजावणी अतिरिक्त मुख्य सचिव, कामगार सुरेश चंद्रा यांनी केली असून, त्यात असे लिहिले आहे की, कोणतीही संस्था महिला कर्मचाऱ्याला तिच्या लेखी संमतीशिवाय नाईट शिफ्टमध्ये काम करू शकत नाही. जर महिला संध्याकाळी 7 ते सकाळी 6 दरम्यान काम करत असेल तर कंपनी किंवा संस्थेला तिला घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घरापर्यंत मोफत कॅबची सुविधा द्यावी लागेल.
महत्वाच्या बातम्या :
- Yogi Adityanath : 2024 मध्ये यूपीत 75 जागा जिंकण्याचं भाजपचं उद्दीष्ट, योगी आदित्यनाथ यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश
- Mann Ki Baat : उद्योग, योग, तीर्थक्षेत्र आणि बरंच काही, 'मन की बात'मधील महत्वाचे दहा मुद्दे
- Mann Ki Baat : स्टार्टअपमध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! 'युनिकॉर्न'ची संख्या 100वर; पंतप्रधानांकडून कौतुक