Jaipur Dogs Attack On Child : राजस्थानच्या (Rajsthan) जयपूर (Jaipur) शहरात भटक्या कुत्र्यांच्या कळपाने एका चिमुकल्यावर प्राणघातक हल्ला केल्याचं समोर आलं आहे. या हल्ल्यामध्ये मुलागा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाली आहे. व्हायरल सीसीटीव्ही फुटेजमध्ये भटके कुत्रे चिमुकल्यावर हल्ला करताना दिसत आहेत. कुत्रे मुलावर हल्ला चढवतात. यावेळी मुलगा गाडीच्या मागे पळतो. मात्र त्यानंतर हा भटक्या कुत्र्यांच्या एक कळप चिमुकल्याला चारी बाजूंनी घेरत हल्ला करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये पुढे काही रहदारी करणाऱ्या लोकांनी कुत्र्यांना पळवून लावत मुलाला वाचवले. मात्र, तोपर्यंत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. ही घटना 19 मे रोजी घडली. घटनास्थळाजवळ बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने हे प्रकरण उघडकीस आलं. जयपूर शहरात अलिकडच्या काळात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून बहुतांश लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या कुत्र्यांच्या हल्ल्यांना सहज बळी पडत आहेत.
57 वर्षीय अधिकाऱ्यावरही हल्ला
याआधी घडलेल्या एका घटनेत जयपूरच्या वैशाली नगर भागात कुत्र्याच्या हल्ल्यात 57 वर्षीय सेवानिवृत्त लष्करी अधिकारी गंभीर जखमी झाले. ही घटना 3 मार्चची आहे, पीडित व्यक्तीने 18 एप्रिल रोजी त्याच कॉलनीतील रहिवाशाविरोधात तक्रार दाखल केली होती, ज्याच्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्याच्या मालकाने पीडितेला आधी कुत्र्याला तेथून पळवून देण्याचे आश्वासन दिलं. पण कुत्र्याच्या मालकानं आपलं आश्वासन न पाळल्यानं पीडितेने वैशाली नगर पोलीस ठाण्यात मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
नऊ वर्षांच्या मुलावरही हल्ला
जयपूर शहरातील रामगंज भागात 14 एप्रिल रोजी एका नऊ वर्षांच्या मुलावर पाळीव कुत्र्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलाच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर गंभीर जखमा झाल्या होत्या.
इतर बातम्या