Yogi Adityanath : 2024 साली देशात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी आतापासूनच कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपने 75 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यादृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यापैकी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत 75 जागा जिंकण्याचे उद्दीष्ट भाजपने ठेवले आहे. त्यादृष्टीनं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अपना दलाने दोन जागा जिंकल्या होत्या. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 80 पैकी 62 जागा आणि मित्रपक्ष अपना दल (एस) ला दोन जागा मिळाल्या होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अटलबिहारी वाजपेयी वैज्ञानिक अधिवेशन केंद्रात पक्षाच्या एकदिवसीय राज्य कार्यकारिणीच्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधीत केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर त्यांची भूमिका मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना योगी म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीसाठी आतापासूनच मैदान तयार करायचे आहे.
75 लोकसभा जागांचे लक्ष्य पूर्ण करु
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळं आतापासून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आपल्याला पुढे जायचे आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला पुन्हा एकदा सिद्ध करायचे आहे. त्यामुळे 75 लोकसभा जागांचे लक्ष्य घेऊन पुढे जा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तुम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने ते पुन्हा एकदा प्रत्यक्षात आणू, असा विश्वास योगींनी व्यक्त केला.