एक्स्प्लोर
पत्नीसाठी सिमेंटचा ताजमहाल बांधणाऱ्या अवलियाचा अपघाती अंत
फैजुल कादरी यांनी दिवंगत पत्नी बेगम तज्जमुली यांच्या स्मरणार्थ उत्तर प्रदेशात सिमेंटचा ताजमहाल बांधला होता.
लखनौ : आपल्या पत्नीसाठी सिमेंटचा ताजमहाल बांधणाऱ्या उत्तर प्रदेशातल्या आधुनिक शहाजहाँचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. 87 वर्षीय फैजुल हसन कादरी यांचा बाईकच्या धडकेत करुण अंत झाला.
ज्याप्रमाणे शहाजहाँने मुमताजसाठी आग्य्रात संगमरवरी दगडाचा ताजमहाल उभारला. त्याचप्रमाणे फैजुल यांनी दिवंगत पत्नी बेगम तज्जमुली यांच्या स्मरणार्थ सिमेंटचा ताजमहाल बांधला. फैजुल यांच्या अमर प्रेमाची देशभर चर्चाही झाली.
पोस्टमास्टर पदावरुन निवृत्त झालेल्या फैजुल यांच्या पत्नीचं 2011 मध्ये निधन झालं होतं. त्याच वर्षी त्यांनी कसेरा कला या आपल्या गावात ताज महाल बांधण्यास सुरुवात केली. अनेक जणांनी त्यांना आर्थिक मदतही देऊ केली, मात्र त्यांनी ती स्वाभिमानाने नाकारली. उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश सिंग यांनीही त्यांची भेट घेतली होती.
फैजुल गुरुवारी रात्री आपल्या घराबाहेर उभे असताना एका बाईकस्वाराने त्यांना उडवलं. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना अलिगढमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र शुक्रवारी उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. फैजुल यांना पत्नीच्या कबरीजवळ दफन करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement