एक्स्प्लोर
रायबरेलीत एनटीपीसी प्लांटच्या स्फोटात 16 कामगारांचा मृत्यू
बॉयलरचा स्टीम पाईप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
रायबरेली : उत्तर प्रदेशातील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक विद्युत प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन 16 कामगारांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 100 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत.
बॉयलरचा स्टीम पाईप फुटल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. 500 मेगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात हा स्फोट झाला. आगीत होरपळून 16 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीररित्या भाजले आहेत.
दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर मदतकार्य हाती घेण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून अॅम्ब्युलन्स मागवण्यात आल्या आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement