एक्स्प्लोर
उरी हल्ल्याचा बदला, LOC पार करुन 20 अतिरेक्यांचा खात्मा

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील उरी इथं झालेल्या हल्ल्यानंतर, पाकिस्तानला चोख उत्तर द्या, अशी मागणी गल्लीपासून दिल्लीपर्यंत होत आहे. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या चर्चेच्या फैरी झडत असताना, तिकडे भारताच्या दोन तुकड्यांनी नियंत्रण रेषा पार करुन एक-दोन नव्हे तर 20 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 'द क्विंट' या वेबसाईटने हा दावा केला आहे. हेलिकॉप्टरने एलओसी पार 'द क्विंट'च्या बातमीनुसार, उरी हल्ल्यानंतर भारतीय जवानांच्या दोन तुकड्यांनी सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने थेट एलओसी अर्थात नियंत्रण रेषा पार केली. भारतीय जवान थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसले आणि त्यांनी सुमारे 20 अतेरिक्यांचा खात्मा केला. भारताच्या या दोन तुकड्यांमध्ये 18 ते 20 जवानांचा समावेश होता. या जवानांनी उरी हल्ल्याचा बदला थेट LOC पार करुन घेतला. या जवानांनी 20 अतिरेक्यांना शोधून शोधून टिपलं, शिवाय सुमारे 200 जणांना जखमी केल्याचा दावाही 'द क्विंट'ने केला आहे. भारतीय लष्करातील सूत्रांच्या माहितीच्या आधारे 'द क्विंट'ने हा दावा केला आहे. अतिरेक्यांनी उरीमध्ये रविवारी 18 सप्टेंबरला भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला केला होता. यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले. तर जवानांनी चार दहशतवाद्यांना त्याचवेळी कंठस्नान घातलं होतं. त्यानंतर 20 सप्टेंबरच्या रात्री भारतीय जवानांच्या तुकड्यांनी LOC मध्ये घुसून अतिरेक्यांच्या खात्मा केला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक






















