एक्स्प्लोर
इव्हेंट मॅनेजमेंट करुन युद्ध जिंकता येत नाही: राहुल गांधी

नवी दिल्ली: उरी दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीत खलबतं सुरु असताना राहुल गांधींनी मात्र मोदींवर टीका केली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट करून युद्ध जिंकता येत नाही, असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदींना लगावला आहे. राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका करताना रालोआ सरकारने पीडीपीशी युती करुन, दहशतवादाला मोकळं रान मिळवून दिलं. केंद्राचे काश्मीर प्रश्नी निश्चित धोरण नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. काँग्रेस उपाध्यक्षांनी यावेळी यूपीए सरकारच्या कार्यपद्धतीचेही मुक्तकंठाने कौतुक केलं. यूपीए सरकारने काश्मीरमध्ये दहशतवादाला तोंड वर काढू दिले नव्हते असे ते यावेळी म्हणाले आहेत. एकीकडे उरी हल्ल्यावरुन राजकारण सुरु असताना, दुसरीकडे सैन्य दलाने एसओपी (स्टॅण्डर्ड ऑपरेशन प्रोसिजर)मध्येही महत्त्वाचे फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय सरकारने पाकिस्तान विरोधात पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















