एक्स्प्लोर

मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना

उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.

Lucknow Coaching Centre Fire News :  उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एक तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावर कोचिंग सेंटर होते. त्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले होते. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत 15 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 

आगीसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश 

लखनौमधील आगीतील मृतांचा आकडा वाढला आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या आगीत 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री फोनवरून बचाव कार्याची माहिती सातत्याने घेत आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी सांगितले की, लखनौमधील आगीत एकूण 15 मुलांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. बचावकार्य पूर्ण झाले असून, संपूर्ण सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे. उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलीगढमधील आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून ते लवकरच घटनास्थळी पोहोचतील.

मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर

लखनौमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे  त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

ही आग अचानक लागली. ते एक ॲनिमेशन केंद्र होते. येथे मुले ॲनिमेशन, म्हणजेच कार्टून बनवायला शिकायला येत होती. ही घटना नेमकी कशी झाली, याबद्दल  अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जखमींना केजीएमसी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले जात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रधान सचिव (गृह) आणि डीजीपी यांना घटनास्थळी बोलावून, घटनेच्या कारणांची चौकशी करण्याचे आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर कारवाई सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Minister Wealth : देशातील सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
सर्वात मोठा श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget