एक्स्प्लोर
नोटाबंदीवरुन आजही संसद तापणार
नवी दिल्ली : नोटाबंदीच्या मुद्द्यावर आजही संसदेत गदारोळ होण्याची शक्यता आहे. नोटाबंदीवर चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत हजर राहावं, यावरुन विरोधक अडले आहेत. आज सकाळी 11 वाजता लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरु होईल.
नोटाबंदीमुळे सामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधानांनी यावर ठोस निर्णय घ्यायला हवा, अशी मागणी विरोधकांची आहे. मात्र पंजाब दौऱ्यामुळे पंतप्रधान मोदी आजही राज्यसभेत बोलण्याची शक्यता कमीच आहे.
मोदी आज पंजाब दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी आज एक दिवसाच्या पंजाब दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदी पंजाब सरकारच्या दोन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 11.30 वाजता मोदी भठिंडा पोहोचतील. तिथे होणाऱ्या एम्सचं भूमीपूजन मोदींच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर ते लोकांना संबोधित करतील. यानंतर दुपारी 2 वाजता मोदी पंजाबच्या आनंदपूर साहिब इथे दाखल होतील, तिथे शुक्रवारपासून श्री गुरु गोविंदसिंह यांच्या 350 जयंती पर्व सुरु आहे.
कॅबिनेट बैठकीत कॅशलेस इकॉनॉमीवर चर्चा
केंद्रीय मंत्रीमंडळाची गुरुवारी रात्री बैठक झाली. या बैठकीत कॅशलेस इकॉनॉमीवर चर्चा झाली. त्याशिवाय ई-बँकिंगला प्रोत्साहन देण्यावरही जोर देण्यात आला. याशिवाय 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर संसदेत सुरु असलेल्या वादावर आणि लोकांना होत असलेल्या अडचणींवरही मंत्र्यांनी चर्चा केली.
मनमोहन सिंहांचा मोदींना राज्यसभेत एक सवाल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नोटबंदीमागील हेतू योग्य असला, तरी तो या निर्णयाने साध्य होणार नाही, असं स्पष्ट मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राज्यसभेत व्यक्त केलं. तुमच्या खात्यात पैसे कितीही भरु शकता, मात्र पैसे काढू शकत नाही, अशी परिस्थिती सध्या भारतात आहे. जगात असा कोणता देश आहे, जिथे पैसे भरु दिले जातात पण काढू दिले जात नाहीत? हे पंतप्रधानांनी सांगावं, असा सवाल मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. नोटंबदीचा घेतलेला निर्णय हा संघटित लुटीसारखा आहे, असा हल्लाबोलही मनमोहन सिंहांनी केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement