UP Rain: उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हैदोस; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, 19 जणांचा मृत्यू
UP Rain: सध्या उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. राजधानी लखनौसह इतर अनेक जिल्ह्यांमध्ये सततच्या पावसामुळे गेल्या 24 तासांत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
![UP Rain: उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हैदोस; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, 19 जणांचा मृत्यू UP Weather updates heavy rain in uttar pradesh 19 people killed in last 24 hours due to heavy rains UP Rain: उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हैदोस; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, 19 जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/12/8105245d56763059783541bd3e0365f41694492928383713_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
UP Weather News: सध्या उत्तर प्रदेशात पावसाने (UP Rain) पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. उत्तर प्रदेशातील बहुतांश भागात संततधार पावसाने (Rain) नागरिकांना उष्णतेपासून दिलासा दिला असतानाच काही ठिकाणी मुसळधार पावसाने कहर केला आहे. राज्याच्या मध्यवर्ती भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे काही ठिकाणी शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत पावसाशी संबंधित घटनांमध्ये 19 जणांचा मृत्यू झाला आहे, पुढेही हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
राजधानी लखनौला पावसाचा फटका
उत्तर प्रदेशची राजधानी लखौमध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील घरं पाण्याखाली गेली आहेत. नाले तुंबल्याने रस्ते पूर्णपणे पाण्याने भरुन गेले आहेत आणि वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशात 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर नंतर 17 सप्टेंबरपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता
लखनौच्या हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासांत 40 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. ज्यामध्ये राजधानी लखनौ आणि बरेली, कानपूर, शाहजहांपूर, फतेहपूर, सीतापूर, लखीमपूर खेरी, फारुखाबाद, फिरोजाबाद, बाराबंकी, हाथरस, रामपूर, कन्नौज, संभल, बिजनौर आणि मुरादाबाद या जिल्ह्यांचा समावेश आहे.
10 जिल्ह्यांतील 19 तालुके पुराच्या विळख्यात
अतिवृष्टीमुळे राज्यातील 10 जिल्ह्यांतील 19 तालुक्यांना पुराचा तडाखा बसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (SDRF) अनेक पथकांकडून अनेक गावांत बचावकार्य सुरू आहे. शेकडो गावांत राहणाऱ्या बाधित गावकऱ्यांच्या मदत आणि बचावासाठी या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यासोबतच मुसळधार पावसाचे ग्रासलेल्या लोकांना मदत साहित्यांचं वाटप आणि गुरांचं लसीकरण करण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते खचले
अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याने रस्त्याचंही नुकसान झालं आहे, वाहतुकीवरही याचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुंबल्याने रस्ते पूर्णपणे पाण्याने भरले आहेत. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे बाराबंकी शहरात रेल्वे मार्गावर पाणी भरलं. रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवा देखील ठप्प आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान होत आहे.
हेही वाचा:
Lucknow Rain: लखनौमध्ये पावसाचा कहर; वीज कोसळून नुकसान, रस्तेही खचले, पाहा भीषण फोटो
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)