एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यूपीत 'यादवी' : हकालपट्टी केलेल्या चारही मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये वापसी होणार
लखनौ : उत्तर प्रदेशातील सत्तासंघर्षात मंत्र्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग आजही सुरुच आहे. कारण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी हकालपट्टी केलेल्या चार मंत्र्यांचं अवघ्या 48 तासांत पुनरागमन होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
अखिलेश यादव यांनी 23 ऑक्टोबर रोजी काका शिवपाल यादव, ओमप्रकाश सिंह, नारद राय आणि शादाब फातिमा यांची मंत्रिपदं काढून घेतली होती. मात्र आता ते मंत्रिमंडळात परत येणार आहे.
गळाभेटीदरम्यानच अखिलेश-शिवपाल मंचावर भिडले
मुलायम सिंहांकडून तात्पुरती मलमपट्टी काका शिवपाल यादव यांच्यासह चार मंत्र्यांच्या हकालपट्टीचा बदला म्हणून अखिलेश यांचे निकटवर्तीय रामगोपाल यादव यांची पक्षातूनच हाकालपट्टी केली होती. त्यानंतर झालेल्या पक्षाच्या बैठकीत अखिलेशने सरकार चालवावं, तर शिवपालने पक्ष चालवावा, असा आदेश देत समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम यांनी पक्षातील सत्तासंघर्षावर तात्पुरती मलमपट्टी केली.दिल्लीदूत : यादवांचं महाभारत…
बैठकीतच काका-पुतण्यामध्ये धक्काबुक्की मात्र बैठकीतील आरोप-प्रत्यारोपांनंतर मुलामय यांनी काका-पुतण्याची गळाभेटही घडवून आणली. मात्र अवघ्या काही सेंकदात दोघांमध्ये पुन्हा ठिणगी पडली. अखिलेश खोटे बोलतो, असा आरोप शिवपाल यांनी केला. विशेष म्हणजे व्यासपीठावरच दोघांमध्ये धक्काबुक्कीही झाली. शिवपाल आणि मंत्र्यांच्या वापसीवर जाणकार काय म्हणतात... पण आज मुलायम सिंह यांच्या आदेशानुसार साऱ्या मंत्र्यांची घरवापसी झाल्यामुळे पुन्हा एकदा शिवपाल यांचं पक्षातलं वजन वाढलं आहे. तर ही वापसी अखिलेश यांची सत्तेवरची पकड सैलहोत असल्याचे संकेत असल्याचं विश्लेषण राजकीय जाणकार करत आहेत.यूपीत पुन्हा ‘यादवी’, सपा आज फुटणार?
नेमका वाद काय? निवडणुकांच्या तोंडावर जो कोणी पक्षात येईल, त्याला प्रवेश द्यायचा हा शिवपाल यादव यांचा निर्णय. मात्र त्याला मुख्यमंत्री आणि पुतण्या अखिलेश यांचा विरोध होता. त्यातच सप्टेंबर महिन्यात गायत्री प्रजापती, राजकिशोर सिंह या दोन मंत्र्यांना पैशांच्या अफरातफरीच्या आरोपावरुन अखिलेशनं मंत्रिमंडळातून हाकललं. हे दोन्हीही मंत्री शिवपाल यांच्या जवळचे. त्यानंतर शिवपाल यादव यांची सगळी महत्वाची खाती काढून घेतली. या कृतीनं दोघांमधली दरी चांगलीच रुंदावली. हा सर्व वाद दीड महिन्यापूर्वीचा होता. त्यानंतर स्वत: नेताजींनी म्हणजेच मुलायम सिंहांनी हा वाद मिटवला होता. शिवपाल परत मंत्रिमंडळात आले होते.उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादवांसहित चार मंत्र्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी
पुन्हा वाद उफाळला शिवपाल यादव हे मुलायमसिंहांचे लहान बंधू. तेच त्यांच्या जास्त जवळचे आहेत. त्यामुळेच शिवपाल यांनी मंत्रिमंडळात परतल्यानंतर अखिलेश समर्थकांवर धडाधड वार करण्यास सुरुवात केली. अखेरीस या सगळ्याचा स्फोट झाला. अखिलेशनं दीड महिन्याच्या काळात पुन्हा एकदा आपल्या काकाला हिसका दाखवला. थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी करुन. म्हणजे ज्या शिवपाल यांच्याकडे सिंचन, पीडब्लूडी, महसूल यासह सहा महत्वाची खाती होती ते एका झटक्यात मंत्रिमंडळातून बाहेर फेकले गेलेत. अर्थात या चालीला उत्तर द्यायला मुलायम यांना दोन तासही लागले नाहीत. त्यांनी तातडीनं अखिलेशचे गुरु मानले जाणारे रामगोपाल यादव यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित केलं. वर त्यांच्यावर भाजपशी साटंलोटं करुन पक्षाला संपवण्याचा कट रचल्याचा आरोपही केला.यादव कुटुंबात महाभारत, नेमका वाद काय?
कोण कुणाच्या बाजूने?मुलायम सिंह | अखिलेश यादव |
शिवपाल यादव (सख्खाभाऊ) | पत्नी डिंपल यादव |
मुलायम सिंहांची पत्नी साधना | रामगोपाल यादव (मुलायम सिंहांचे |
मुलगा प्रतिक यादव | अक्षय यादव (रामगोपाल यांचे पुत्र) |
शिवपाल यांचा मुलगा आदित्य |
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
निवडणूक
Advertisement