UP Election : काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि स्कूटी देणार: प्रियांका गांधींचे आश्वासन
UP Assembly Election : महिलांना 40 टक्के तिकिटं देण्याच्या घोषणेनंतर आता बारावी पास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कूटी देण्याचं आश्वासन प्रियांका गांधींनी दिलं आहे.
UP Assembly Election 2022 : पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यावर आतापासूनच राज्याचे राजकीय वातावरण तापलं असून सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केल्याचं दिसून येतंय. विधानसभेच्या निवडणुकीसाठी महिलांना 40 टक्के तिकीटं देण्याच्या घोषणेनंतर आता बारावी पास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना स्कूटी देण्याचं आश्वासन काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी (Priyanka Gandhi) दिलं आहे.
काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी म्हणाल्या की, "माझी काही विद्यार्थ्यांशी भेट झाली. त्यावेळी शिक्षणासाठी आणि सुरक्षेसाठी स्मार्टफोनची गरज असल्याचं विद्यार्थांनी सांगितलं. त्यामुळे काँग्रेस जर सत्तेत आलं तर बारावी पास विद्यार्थ्यांना स्मार्टफोन आणि पदवी पास झालेल्या विद्यार्थ्यांना स्कूटी देण्यात येईल. ही घोषणा करताना मला आनंद होतोय."
कल मैं कुछ छात्राओं से मिली। उन्होंने बताया कि उन्हें पढ़ने व सुरक्षा के लिए स्मार्टफोन की जरूरत है।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) October 21, 2021
मुझे खुशी है कि घोषणा समिति की सहमति से आज UP कांग्रेस ने निर्णय लिया है कि सरकार बनने पर इंटर पास लड़कियों को स्मार्टफोन और स्नातक लड़कियों को इलेक्ट्रानिक स्कूटी दी जाएगी। pic.twitter.com/hoW5DfhS3f
निवडणुकीतील 40 टक्के तिकीटं ही महिलांना देणार
आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून 40 टक्के तिकीटं ही महिलांना देण्यात येण्याची घोषणा या आधीच प्रियांका गांधी यांनी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बदल हवा असं म्हणणाऱ्या सर्व महिलांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याची प्रगती हवी आहे असं ज्या महिलांना वाटतं त्या सर्वजणी राजकारणात पूर्ण सहभागी होतील असं प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या. जातीच्या आधारावर नव्हे तर महिलांच्या पात्रतेच्या आधारे त्यांनी तिकीट देण्यात येणार असल्याचं देखील काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी म्हणाल्या.
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील 78 जागांपैकी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली होती. तर त्या आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत 403 पैकी 7 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महिलांना 40 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या या निर्णयामुळे काँग्रेस मतदारांना आकर्षित करु शकेल असं मत काही राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
