News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मुजोर भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकणाऱ्या 'मर्दानी'ची बदली

FOLLOW US: 
Share:
लखनौ : उत्तर प्रदेशातील मुजोर भाजप कार्यकर्त्यांना जशास तसे उत्तर देणारी 'मर्दानी' पोलिस अधिकारी श्रेष्ठा ठाकूर यांची बदली करण्यात आली आहे. सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या भाजपच्या पाच स्थानिक कार्यकर्त्यांना त्यांनी तुरुंगवारी घडवली होती. श्रेष्ठा ठाकूर यांची बहारिचमध्ये शनिवारी ट्रान्सफर करण्यात आली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत 11 आमदार आणि खासदारांनी केलेल्या बैठकीच्या आठवड्याभरानंतर हा निर्णय समोर आला. स्थानिक नेत्यांनी 'ती' हुज्जत प्रतिष्ठेचा मुद्दा करत ठाकूर यांच्या वरिष्ठांवर दबाव आणल्याचं म्हटलं जातं. पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते यांचा सन्मान राखण्यासाठी श्रेष्ठा ठाकूर यांची बदली आवश्यक होती, असं वक्तव्य भाजपचे शहराध्यक्ष मुकेश भारद्वाज यांनी कुठलीही लाज न बाळगता केलं. मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा ठपका पोलिसांवर ठेवण्यात आला. काय आहे प्रकरण? पोलिस मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या गराड्यातही सर्कल ऑफिसर श्रेष्ठा ठाकूर यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ठाकूर यांनी उत्तर प्रदेशातील भाजपच्या कार्यकर्त्यांची मुजोरी सहन न करता चोख उत्तर दिलं. भाजप नेते प्रमोद लोधी यांच्याकडे गाडीची कागदपत्रं नसल्यामुळे त्यांचं चलान म्हणजेच दंड आकारण्यात आला. याविरोधात भाजप समर्थकांनी गुंडगिरी करत श्रेष्ठा ठाकूर यांना जाब विचारला.

VIDEO: मुजोर भाजप कार्यकर्त्यांना 'मर्दानी' पोलिसाचं प्रत्युत्तर

'तुम्ही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जा आणि पोलिसांना वाहनं तपासण्याचा कोणताही अधिकार नाही, हे लेखी आणा' असं उत्तर ठाकूर यांनी लोधी यांना दिलं. तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाचं नाव बदनाम होतं, अशा शब्दात श्रेष्ठा यांनी खडे बोल सुनावले होते. 'आम्ही पोलिस कर्तव्य बजावण्यासाठी तासन् तास उभे राहतो, हौस म्हणून नाही.' असं म्हणत उपस्थितांची बोलती बंद केली होती. पाहा व्हिडिओ :
Published at : 02 Jul 2017 03:18 PM (IST) Tags: bjp workers woman Video उत्तर प्रदेश पोलिस महिला बदली transfer Police uttar pradesh

आणखी महत्वाच्या बातम्या

Siddaramaiah  : आमच्या 50 आमदारांना 50-50 कोटींची ऑफर, सिद्धारामय्यांचा भाजपवर आरोप, कर्नाटकात पु्न्हा ऑपरेशन लोटसच्या चर्चा

Siddaramaiah : आमच्या 50 आमदारांना 50-50 कोटींची ऑफर, सिद्धारामय्यांचा भाजपवर आरोप, कर्नाटकात पु्न्हा ऑपरेशन लोटसच्या चर्चा

पगार 1 लाखाच्या पुढे, पदांची संख्या 261, युवकांना GAIL India मध्ये नोकरीची मोठी संधी

पगार 1 लाखाच्या पुढे, पदांची संख्या 261, युवकांना GAIL India मध्ये नोकरीची मोठी संधी

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार

Supreme Court on Ajit Pawar NCP : तुमच्या स्वत:च्या पायावर उभं राहा! शरद पवारांचं नाव का वापरता? अजित पवार गटाला 'सर्वोच्च' फटकार

NCP Crisis: घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार, पण शरद पवारांचे फोटो अन् व्हिडिओ वापरु नका; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

NCP Crisis: घड्याळ चिन्ह गोठवण्यास नकार, पण शरद पवारांचे फोटो अन् व्हिडिओ वापरु नका; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

मोठी बातमी! गौतम अदानींची नवीन योजना, 'या' क्षेत्रात करणार 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

मोठी बातमी! गौतम अदानींची नवीन योजना, 'या' क्षेत्रात करणार 42 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

टॉप न्यूज़

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन

उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका

उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका

Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

Kailas Patil : कैलास पाटील उद्धव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली

Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली