उत्तर प्रदेशात अत्यावस्थ स्थितीत शेतात आढळलेल्या तीन अल्पवयीन मुलींपैकी दोघींचा मृत्यू, विरोधक आक्रमक
उन्नावमध्ये तीन मुली जनावरांसाठी चारा घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्या तिघी घरी आल्याच नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, तिघीही गावाबाहेरील शेतात आढळल्या.
उन्नाव : उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील असोहा परिसरातील बाबुराहा गावाजवळ तीन मुली बुधवारी चिंताजनक स्थिती आढळल्या झाल्या. तीन पैकी दोन मुलींचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुलींचा शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाऊ शकते.
दोन बहिणींचे मृतदेह शेतात सापडल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार आणि उन्नाव येथील सुनील साजन यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. आज पुन्हा एकदा उन्नाव घटनेने संपूर्ण राज्य लज्जित झाले आहे. उत्तर प्रदेशात जंगलराज आहे. मागासलेल्या आणि दलित समाजातील मुली सुरक्षित नाहीत.
उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी सांगितले की, बाबुराहा गावात दुपारी तीनच्या सुमारास एकाच कुटुंबातील 15, 14 आणि 16 वर्षांच्या तीन मुली जनावरांसाठी चारा घेण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्या तिघी घरी आल्याच नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला असता, तिघीही गावाबाहेरील शेतात आढळल्या. तिघींनाही एका ओढणीने बांधण्यात आलं होतं.
एका मुलीची प्रकृती चिंताजनक
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही मुलींना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी दोन मुलींना मृत घोषित केले. एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्या मुलीला उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमिक उपचारानंतर तिला कानपूरला हलवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या मते, प्रथमदर्शनी प्रकरण विषप्राशन केल्याचं दिसून येत आहे. पोलीस अधिक तपास करत असून लवकरच काही गोष्टी स्पष्ट होती