एक्स्प्लोर
मोदी आणि जनतेमधील संवादात मधमाशांचा खो?
नवी दिल्ली: अमेरिकेप्रमाणेच जनतेशी थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेद्र मोदींच्या कार्यक्रमाला मधमाशा आणि भटक्या कुत्र्यांनी मोठे आव्हान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ६ ऑगस्ट रोजी 'माय गाव' या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याची इच्छा होती. यासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडिअममध्ये अमेरिकेप्रमाणेच टाऊन हॉल आयोजन करण्यात आले होते.
2000 नागरिकांना आमंत्रण
या कार्यक्रमासाठी 2000 नागरिकांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या तयारीत आयोजकांसमोर एक नवी समस्या आव असून उभी राहिली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी मधमाशांचे भले मोठे पोळे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, हे पोळे पंतप्रधानांसाठी जिथे व्यासपीठ उभारले जाणार आहे, तिथेच हे स्टेज उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यक्रमादरम्यान मधमाशा त्या पोळ्यातून बाहेर आल्यास काय होईल या वरूनच आयोजक चिंतातूर झाले आहेत.
मधमाशांचे पोळे हटवण्यासाठी प्रोफेशन नागरिकांचा शोध
या कार्यक्रासाठी आता काहीच दिवस राहिले असल्याने, त्यामुळे दिल्लीसोबत चारीही राज्यात मधमाशांचे पोळे हटवू शकणाऱ्या पारंगत व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. दिल्ली व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आदि राज्यांतून अशा व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. या व्यतिरिक्त या परिसरात आणखी तीन समस्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भटक्या कुत्र्यांचेही आव्हान
या परिसरात शंभरहून अधिक भटक्या कुत्र्यांची संख्या आहे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी दिल्ली नगर निगम आणि एनडीएमसीचे पथक तैनात करण्यात आले आहे.
क्रिकेट सामन्यांचा व्यत्यय
तर दुसरी सर्वात मोठी समस्या म्हणजे, याच ठिकाणी दिनांक 5 आणि 8 ऑगस्ट रोजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आयोजकांना या कार्यक्रमाची वेळ पुढे ढकलण्याचे संकेत देण्यात आल्याचे समजते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement