रेल्वेचं खासगीकरण होणार, रेल्वे मंत्र्यांनी दिलं या प्रश्नाचं उत्तर
रेल्वेचं खासगीकरण होणार यासंदर्भातील अनेक चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. पण...
नवी दिल्ली : रेल्वेचं खासगीकरण होणार यासंदर्भातील अनेक चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. पण, खुद्द रेल्वेमंत्री पीयुष होयल यांनीच याबाबतचं चित्र अधिक चांगल्या पद्धतीना स्पष्ट करत रेल्वे ही भारताची संपत्ती असून, त्याचं खासगीकरण होणार नसल्याची बाब स्पष्ट केली.
प्रवाशांना चांगली सेवा मिळाली, रेल्वेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी मिळाली या दृष्टीनं खासगी क्षेत्रातील गुंतवणूक फायद्याची ठरेल ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. लोकसभेत 2021-22 या वर्षासाठी रेल्वे मंत्रालयाच्या नियंत्रणाधीन असणाऱ्या अनुदानीत मागण्यांच्या बाबत चर्चांवर जोर देत गोयल म्हणाले, 'दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की, अनेक नेतेमंडळी रेल्वे खासगीकरणाचे आरोप करत आहेत. भारतीय रेल्वेचं खासगीकरणं कधीही होणार नाही. ही भारताची संपत्ती आहे. मी तुम्हाला याबाबतचा विश्वास देतो.'
खासगी रेल्वेबाबत गोयल काय म्हणाले?
खासगी रेल्वेबाबत बोलताना गोयल यांनी रस्ते वाहतुकीचं उदाहरण सर्वांपुढे ठेवलं. 'रस्तेमार्गही शासनानं बनवले आहेत. पण, असं नाही म्हटलं जात ती यावर फक्त सरकारी वाहनांचीच ये-जा असेल. रस्त्यावर सर्व प्रकारची वाहनं येतात तेव्हाच त्यांची प्रगती होते आणि तेव्हाच सर्वांना सुविधा मिळतात. मग रेल्वेमध्ये असं होऊ नये का? प्रवाशांना उत्तम सुविधा मिळू नयेत?'
vinayak chaturthi 2021 | 17 मार्चला आहे विनायक चतुर्थी; भक्तांची संकटं होणार दूर
मालवाहतूक रेल्वे आणि त्यांची खासगी क्षेत्रातील गुंतवणूक पाहता, यावर विचार केला जाऊ नये का, असा प्रश्न गोयल यांनी उपस्थित केला. आधुनिक काळातील रेल्वेची अपेक्षा असल्यास त्यासाठी आर्थिक पाठबळही गरजेचं आहे. त्यामुळं खासगी गुंतवणुकीचा मुद्दा इथं आला तर त्याचा फायदा प्रवासी आणि देशालाच होणार आहे. खासगी क्षेत्रातून ज्या सुविधा मिळणार, त्या भारतीय नागरिकांनाच मिळणार आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत भर पडेल, असं म्हणत केंद्र आणि खासगी क्षेत्र एकत्रितरित्या काम करेल तेव्हाच देशाचं उज्ज्वल भवितव्य साकारण्यात हातभार लागेल, ही बाब त्यांनी उचलून धरली.